Download App

नितेश राणे हसतांना नेपाळी वॉचमनच्या मुलासारखे दिसले, भास्कर जाधवांची टीका

  • Written By: Last Updated:

पुणे : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर भाजप आणि शिदें गटाकडून आनंद साजरा करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर त्यांचा हा आनंद वेगवेगळ्या माध्यमातून समोर येतोय. भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आपल्याला किती आनंद झाला हे सांगण्यासाठी त्यांच्या हसण्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी जोरदार टीका केली. नितेश राणे हसतांना एखाद्या नेपाळी वॉचमनच्या मुलासारखे दिसले, असं जाधव म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, याच धनुष्यबाणाने तुमच्या वडिलांना राज्याचे मुख्यमंत्री केले होते. याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतो. पण हे नितेश राणे हसत असतांना मला एखाद्या नेपाळी वाचमॅनच्या मुलासारखे दिसले, असा टोला जाधवांनी लगावला. त्याचं हास्य किती काळ टिकेल? असं पत्रकारांनी विचारले असता, भास्कर जाधव म्हणाले, जरा नितेश राणे भेटले की, तुम्ही ते बघा किती काळ ते नेपाळी वॉचमनच्या मुलासारखे दिसतात.

ठाकरे यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह निसटलं आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी हे खूप मोठं संकट आहे. पण त्यांच्या या संकटकाळात ठाकरे गटाच्या विरोधकांना खूप मोठा आनंद झालाय. नितेश राणे यांनाही आपला आनंद लपवता आला नाही. त्यांनी आपल्याला निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा केवढा आनंद झाला हे दाखवण्यासाठी त्यांच्या हसण्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. आपला हा व्हिडीओ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवा. आपण किती हसतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असं त्यांनी म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर आता भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, १२ आमदारांचं जे पत्र होतं ते सही करण्यासाठी मला धमकावलं, त्यामुळं मी त्यावर सही केली नाही, असं विधान माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया देतांना जाधव म्हणाले, आता नंतर बोलून काय फायदा? ललिळ हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आता काय म्हणतात, आता पदावरून दूर गेल्यानंतर त्यांना घडून गेलेल्या गोष्टी चूकीच्या वाटतात. पण ह्या गोष्टी खरोखर चूकीच्या होत्या,स असं त्यांना वाटत असेल तर पदावर असतांना त्यांना कुणाचं भय होतं? कुठलही भय न बाळगता विवेक बुध्दीने स्मरुन तेव्हाच योग्य निर्णय घेतले असते तर देशाची लोकशाही बळकट झाली असती, असंही भास्कर जाधव म्हणाले.

Uddhav Thackeray म्हणतात… निवडणूक आयोगाविरोधात देशभर रान पेटणार!

Tags

follow us