Download App

मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकराला ‘सुप्रीम’ दिलासा; 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेस SC ची स्थगिती

IAS trainee Puja Khedkar News : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला (Puja Khedkar) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. तिच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणतीही कारवाई नाही. पूजा खेडकरच्या अटकेला सुप्रिम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिलीय.

आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पूजा खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

 

…तर त्यांना अटक झाली असती; मोहन भागतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून असं का म्हणाले राहुल गांधी ?

पूजा खेडकरवर तीन आरोप आहेत. चौकशी न करता जामीन नाकारण्यात (Puja Khedkar News) आला. हायकोर्टाच्या टिप्पण्यांमुळे खटला पूर्वनिर्धारित होतो, अशी माहिती अ‍ॅड. सिद्धार्थ लुथरा यांनी दिली आहे.

पुजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून मी एक दिव्यांग अन् अविवाहित महिला आहे. शारिरीक पडताळीनंतर माझी नियुक्ती केली गेली होती. त्यामुळं मला अखिल भारतीय सेवा कायदा नियमांनुसार संरक्षण मिळतंय. जोपर्यंत मी दिव्यांग नसल्याचं सिद्ध होत नाही, तोवर मला पुढील संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.

युपीएससीने पूजा खेडकरविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात खटला दाखल केला होता. या प्रकरणात पुजा खेडकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील वर्षी 12 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं. त्यानंतर मात्र 23 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयाने तो अर्ज रद्द केला होता. म्हणून पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

बीड प्रकरणात सुरेश धसांची भूमिका हवालदाराची; सदावर्तेंनी फोडलं नव्या वादाला तोंड

बातमी अपडेट होत आहे….

 

follow us