बीड प्रकरणात सुरेश धसांची भूमिका हवालदाराची; सदावर्तेंनी फोडलं नव्या वादाला तोंड

  • Written By: Published:
बीड प्रकरणात सुरेश धसांची भूमिका हवालदाराची; सदावर्तेंनी फोडलं नव्या वादाला तोंड

मुंबई : बीड हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) नव्या वादाला तोंड फोडलं आहे. बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसेच आमदार सुरेश धस (Suresh Dhas) एकेक माहिती शोधून काढत असल्याचे सदावर्तेंनी म्हटले आहे. तसेच या हत्या प्रकरणाच्या तापासातून लोकप्रतिनीधींनी बाजूला व्हावं अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. (Advocate Gunaratna Sadavarte On Suresh Dhas)

कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं

SIT चे प्रमुख तेली आष्टीचे जावई

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नव्या एसआयटीची स्थापना केली आहे. सरकारच्या या निर्णयावर वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी सुरेश धसांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहे. आताचे SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. शितल उगले या IAS ऑफिसर असून त्या आष्टीच्या राहणाऱ्या आहेत. धसांनी जावई इथे SIT मध्ये आणून बसवले असल्याचा आरोप वाल्मिक कराडांच्या पत्नीने केला आहे.

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया 

…तर तेलींनी वेगळं होण्यास हरकत नाही

यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, पोलीस अधिकारी असलेल्या तेली यांची हिस्ट्री जॉग्रफी मला माहिती नाही. पण जर हे अधिकारी धसांशी संबंधित असतील आणि जर धस यांचं एका विशिष्ट जात समूहाच्या उद्देशानं जे काही चाललेलं म्हणजे त्यांचं बोलणं, चालणं यामुळे वंजारी समाज विक्टीम होत आहे. ही जर वस्तुस्थिती असेल तर तपासातील अधिकाऱ्यांनी स्वतःहून यापासून वेगळं राहायला काही हरकत नसल्याचेही सदावर्ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube