Maratha Reservation : ‘हू इज जरांगे’, गुणरत्न सदावर्ते पुन्हा कडाडले

Maratha Reservation : ‘हू इज जरांगे’, गुणरत्न सदावर्ते पुन्हा कडाडले

Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांसारखे नेते नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना हवा देत आहेत. त्यांनी असे करू नये, असे सदावर्ते म्हणाले. मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांचे ऐकू नये. याआधीही मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन बेकायदेशीरपणे वर्तन करुन मुंबईत धुडगूस घालणार असल्याचे सांगितले होते. मुंबई काबीज करण्याचा त्यांचा डाव होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात बोलणारा मीच होतो. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून कोणीही मुंबईत येऊ शकत नाही, हे मी दाखवून दिले, असे म्हटले आहे.

जरांगे रोज पटली मारतात, त्यांनी संत तुकाराम महाराजांचाही अपमान केला; बारस्कर महाराजांचे गंभीर आरोप

मनोज जरांगे मुंबईत येत असताना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मी केलेल्या याचिकेनंतरच ही नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांची खिल्लीही उडवली. राज्यपालांची स्वाक्षरी नसेल तर आरक्षण नाही आणि सलाईन लागले नाही तर उपोषण नाही, अशा शब्दांत सदावर्ते यांनी जरांगेंवर निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील नैराश्यात आहेत. अंतरवाली सरटीमध्ये जखमी झालेल्या लोकांना तेच जबाबदार आहेत, असा आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर हल्ला चढवला. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग, बारस्कर महाराजांचे जरांगेंवर गंभीर आरोप

मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाचा लढा सोडावा, त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आता राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण आणि केंद्राने EWS मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण यातील फायद्यांमधील फरक ओळखा. पदरचं आहे ते सोडून द्यायचं. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आरक्षणाचा फायदा घेतात, तेव्हा तुम्हाला दुसरे आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये, असे सदावर्ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube