Download App

वैष्णवी हगवणेचं चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचं जुनं प्रकरण उघड; ‘या’ प्रकरणात 3 वर्षांपूर्वीच गुन्हा

वकील विपुल दुशिंग आरोपींची बाजू मांडत आहेत. युक्तिवादा दरम्यान त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आता मात्र या वकिलांचच एक जुनं प्रकरण समोर आलं आहे.

Vaishnavi Hagavane Death Case : सासरच्यांकडून सतत होणारा छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवी हगवणे या (Vaishnavi Hagawane) विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद अटकेत आहेत. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. वकील विपुल दुशिंग आरोपींची बाजू मांडत आहेत. युक्तिवादा दरम्यान त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आता मात्र या वकिलांचच एक जुनं प्रकरण समोर आलं आहे. सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा विपुल दुशिंग यांच्यावर नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वकील दुशिंग वडगाव मावळ येथील न्यायालयात एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. सुनावणीची तारीख कोणती निश्चित करायची या मुद्द्यावर वकील दुशिंग आणि सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यात वाद झाला. यानंतर संतापलेल्या दुशिंग यांनी न्यायालयातून बाहेर आल्यानंतर अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती. अग्रवाल यांनी या प्रकाराची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून वकील दुशिंग आणि त्यांच्याबरोबरील आणखी दोघा वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मयुरी हगवणे प्रकरण चाकणकरांचे पोलिसांकडे बोट; कारवाईच्या मागणीचे फडणवीसांना पत्र

हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं

हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. या प्रकरणात हगवणे कुटुंबाची बाजू अॅड. विपुल दुशिंग मांडत आहेत. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरु होते आम्ही ते पकडले होते. असा युक्तीवाद हगवणेंच्या वकिलाकडून करण्यात आला. गहाण ठेवलेले 51 तोळे सोने कुठल्या बँकेत आहेत याची माहिती आधीच आमच्याकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे आहे. निलेश चव्हाणने (Nilesh Chavan) वैष्णवीच्या बाळाचा सांभाळ केला पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

नवऱ्याने कानाखाली मारल्या म्हणजे छळ नाही

वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. असं देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. याचबरोबर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाने केला.

नको त्या व्यक्तीसोबत चॅट, फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद

follow us