Download App

दिल्लीमधून सूत्र हलली, ठरलेला निकाल आला; शरद पवार गटाचा हल्लाबोल

Ncp Symbol And Party : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. यावरुन शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय अपेक्षित होता, कारण त्यांच्यावर दिल्लीतून दबाव होता, असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला तो आम्हाला अपेक्षित होता, कारण शिवसेनेच्या संदर्भात निवडणूक आयोगाने प्रथम दोन्ही पक्षाला वेगवेगळी चिन्ह दिली होती. परंतु त्यानंतर दिल्लीमधून सूत्र हलवली गेली आणि दबावाखाली निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता आणि चिन्ह दिले, त्याच वेळेला आम्हालाही लक्षात आलं की आमच्याही बाबतीमध्ये अशाच प्रकारचा दबावाचं राजकारण केले जाईल आणि त्याची प्रचिती आज आम्हाला आली, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढं म्हटले की आमचं 1999 पासून चिन्ह घड्याळ हे गेलं याचं आम्हाला दुःख आहे, पण हे दुःख आम्ही उरावर बाळगणार नाही. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील, जे काही चिन्ह घेतील ते चिन्ह आम्ही घराघरांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्याही वेळेला आम्हाला दोन-तीन महिनेच मिळाले होते, ते चिन्ह आम्ही घराघरांमध्ये पोहोचवलं आणि त्यावेळेला लोकसभेला नऊ खासदार आणि विधानसभेला 50 आमदार आम्ही निवडून आणले होते, असे अकुंश काकडे यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

याही वेळेला शरद पवार यांच्या बाबतीमध्ये जनमानसामध्ये फार मोठा विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आहे आम्ही पुन्हा जोमाने नवीन मिळणारे चिन्ह हे घराघरांमध्ये नेऊ आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा उभा करू हे निश्चित, असा विश्वास अकुंश काकडे यांनी व्यक्त केला.

जरांगेंच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशव्यापी आंदोलनाचा एल्गार; मराठा महासंघाचा इशारा

दरम्यान, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us

वेब स्टोरीज