Esha Deol Divorce : ईशा देओल अन् भरत तख्तानी झाले विभक्त; 11 वर्षांचा संसार मोडला..

Esha Deol Divorce : ईशा देओल अन् भरत तख्तानी झाले विभक्त; 11 वर्षांचा संसार मोडला..

Esha Deol Divorce : बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol Divorce) अन् तिचा पती भरत तख्तानी विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून याबाबत अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी याबाबत एक निवदेन प्रसिद्ध केलं असून “परस्पर संमतीने आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जीवनातील या बदलामध्ये, आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे हे महत्त्वाचे आहे. आमच्या गोपनीयतेची काळजी घेतल्यास आम्ही त्याचा आदर करू.” असं निवेदनात म्हटलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून दोघांमध्येही वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. दोघांमध्येही अनेक मतभेद असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर दोघेही कुठंच एकत्र दिसत नव्हते. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानूसार भरत तख्तानी ईशाची फसवणूक करीत होता. भरत नवीन वर्षांत एका पार्टीत दिसला होता. मात्र, या दाव्यावर देओल कुटुंबियांकडून कोणत्याही स्वरुपात प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दाव्याला दुजोरा नाही.

AUS vs WI : ऑस्ट्रेलियाचा विंडीजला दणका! तिसऱ्या सामन्यात 41 चेंडूतच चारली धूळ; मालिकाही जिंकली

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचं 29 जून 2012 रोजी विवाह झाला. हा विवाह इस्कॉन मंदिरात अतिशय साधेपणाने पार पडला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर, हे कपल मुलगी राध्याचे पालक झाले होतं. त्यानंतर 2019 मध्ये ईशाने त्यांची दुसरी मुलगी मिरायाला जन्म दिला होता.

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याच्या बातम्या याआधी अनेकदा आल्या होत्या. सोशल मीडियावर तिने पतीसह फोटो शेअर करणंही थांबवलं होतं. यासोबतच ईशाचा नवरा हेमा मालिनींच्या ७५ व्या वाढदिवसाला देखील हजर राहिला नव्हता. दोघेही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज