राहुल कलाटेंच्या पुढाकारानं वाकडमध्ये साकारतयं आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम

खेळाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीला चालना आणि वाकडसह शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात नवी ओळख निर्माण करणे, हेच उद्दिष्ट

राहुल कलाटेंच्या पुढाकारानं वाकडमध्ये साकारतयं आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम

राहुल कलाटेंच्या पुढाकारानं वाकडमध्ये साकारतयं आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम

Rahul Kalate Initiative For Developing International Standard Badminton Stadium In Wakad  : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २५ मधील निवडणुकीत भाजप उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर अधिक जोर दिलेला असून त्यादरम्यान वाकडमध्ये पूर्णत्वास येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन स्टेडियम हा निवडणूक प्रचाराचा चर्चेचा विषय ठरला आहे. माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या माध्यमातून हे भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आकार घेत आहे.

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % कमळ फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास

खेळ आणि आरोग्याला प्राधान्य देऊन, आपल्या भागातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत या भावनेतून माजी नगरसेवक आणि भाजप उमेदवार राहुल कलाटे यांनी योजलेल्या या स्टेडियमचा भूमिपूजन कार्यक्रम २०२४ साली पार पडला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होऊ शकतील असे हे स्टेडीयम कलाटे यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास येत असून, परिसरात राहणारे आयटीयन्स, स्थानिक नागरिक आणि आगामी पिढीतील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या बॅडमिंटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज होत आहे. ज्यामुळे या खेळाची आवड असणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी तयारी करणे सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे हे केवळ एक बॅडमिंटन कोर्ट नसून, एक अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणारे स्टेडीयम आहे, ज्यामध्ये ८ बॅडमिंटन कोर्ट आहेत आणि ५५० प्रेक्षक याठिकाणी एकाचवेळी बॅडमिंटनचा खेळ पाहण्यासाठी बसू शकतील, अशी रचना करण्यात आलेली आहे. बॅडमिंटनसाठी शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक पद्धतीचे किंवा खासगी कोर्ट्स उपलब्ध आहेत, परंतु शहरात पूर्णपणे आधुनिक मानकांचे हॉल आणि प्रशिक्षण सुविधांचे अभाव अजूनही जाणवतात. यामुळेच वाकडमधील हे नवीन बॅडमिंटन स्टेडीयम खेळाडूंसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

शरद पवारांची साथ सोडली पण भाजपमध्येच प्रवेश का? राहुल कलाटे स्पष्टच म्हणाले

खेळाला नवी दिशा, खेळाडूंच्या कौशल्याला वाव

हे बॅडमिंटन स्टेडीयम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते, जे खेळाडूंना तातडीच्या सरावासाठी, स्पर्धात्मक कौशल्य वाढविण्यासाठी आणि व्यावसायिक प्रोत्साहनासाठी आवश्यक सर्व सुविधा देईल. यामुळे केवळ मनोरंजनासाठी नाही तर खऱ्या अर्थाने खेळाडूंना योग्य मंच उपलब्ध करून देण्यासाठी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून राहुल कलाटे यांनी प्रयत्न केल्याचे याठिकाणी दिसून येते.

शहरात क्रीडा क्षेत्रांतील पायाभूत सुविधांची पायाभरणी

पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक बॅडमिंटन कोर्ट्स आणि अकॅडमी उपलब्ध असल्या तरी, नागरिक आणि खेळाडू दर्जेदार, मोठ्या क्षमतेचे आणि सार्वजनिक पातळीवर मोफत/कमी खर्चात वापरता येणाऱ्या योग्य सुविधा पाहतात. हेच लक्षात घेता माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २५ चे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांनी नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद देत भविष्यात शहरातील खेळ संस्कृतीला नवा वेग देण्याचे काम पुढे नेले आहे.

धूळ प्रदूषणाने त्रस्त पुनावळेकरांना ऑक्सिजन पार्कचा दिलासा; राहुल कलाटे यांची महत्वाची माहिती

खेळाडू आणि नागरिकांना कोणते लाभ होणार?

-प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना खेळासाठी जागा
-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोर्ट्सवर सराव व स्पर्धा करण्याची संधी
-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याची संधी
-सामाजिक आरोग्य आणि फिटनेसला चालना
-कुटुंबांसाठी आणि युवकांसाठी उच्च दर्जाची मनोरंजक सुविधा

भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्याची पायाभरणी

आपल्या प्रभागातील जनतेच्या सेवेत लवकरच दाखल होत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडीयम हे एक सुसज्ज क्रीडासंकुल असून, भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्याची पायाभरणी आहे. या सुविधेमुळे स्थानिक युवकांना जागतिक दर्जाच्या कोर्ट्सवर सराव करण्याची संधी मिळेल, त्यांच्यातील कौशल्य, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होईल. येणाऱ्या काळात याच धर्तीवर स्विमिंग आणि इतर खेळांचेही स्टेडियम आणि फॅसिलिटी देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. खेळाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देणे आणि वाकडसह शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करणे, हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे कलाटे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version