Download App

लोणावळ्यात फिरण्याचा प्लॅन तर जाणून घ्या नवीन नियमावली, रात्री 12 पासून होणार लागू

Lonavala New Rules : 30 जून रोजी लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) 5 जण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर

Lonavala New Rules : 30 जून रोजी लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) 5 जण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना आदेश देत लोणावळ्यात पर्यटकांसाठी नवीन नियमावली लागू करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावरून आता लोणावळ्यात नवी नियमावली लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्यात फिरायला जाणार असाल तर या नवीन नियमांबद्दल जाणून घ्या नाहीतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

लोणावळ्यात लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार ज्या ठिकाणावरून अन्सारी कुटुंब वाहून गेले होते त्या परिसरात आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात पर्यटकांना 31 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तर आज रात्री बारानंतर आणखी पाच नियम लागू होणार आहे.

काय आहे नवीन नियम

या नवीन नियमानुसार आता सहारा पुलावर वाहने पाकींग करता येणार नाही.

तसेच सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोटया धबधब्याच्या वरच्या बाजूला पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

याच बरोबर पर्यटकांना भूशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून वरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

तर नवीन नियमानुसार भुशी डॅमच्या वेस्ट वेयरच्या डाव्या बाजूने वन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात येत आहे.

तर लायन्स पॉईट / टायगर पॉईट, शिवलिंग पॉईट येथे सायंकाळी 6 वाजलयापासून सकाळी 6 पर्यंत पर्यटकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही गर्दी पाहता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.

हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कारवाई होणार

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात येणार आहे. जेव्हा सार्वजनिक सुट्या असतात आणि विकेंडला लोणावळ्यातील भुशी डॅमवर अनेक तरुण येतात आणि रात्री गोंधळ घालतात तसेच हुल्लडबाजी करतात अशा अनेक तक्ररी येत आहे. त्यामुळे आता लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर अधिकाऱ्यावर कारवाई होणार असं जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले.

विकेंड आणि सार्वजनिक सुट्याच्या दिवशी लोणावळा आणि खंडाळा येथील विविध पॉईंटवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र आता सर्व पर्यटकांना जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. जर असं झाले नाहीतर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलिसांची नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा कोण आहे? एका क्लीकवर जाणून घ्या संपूर्ण इतिहास

follow us

वेब स्टोरीज