सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुखांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती

  • Written By: Published:
सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुखांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : सुहास दिवसे (Suhas Diwase) यांची पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवस यांच्या जागी डॉ.राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांची क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंब्र्याच्या उपटसुंबाला काही कामधंदे राहिलेले नाहीत; मिटकरींची आव्हाडांवर बोचरी टीका 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर आता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Safe Internate Day निमित्त युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्मान खुरानाकडून जनजागृती 

गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि सुहास दिवसे यांच्या बदलीची चर्चा होती. अखेर आज देशमुख आणि दिवसे यांची बदली करण्यात आली. देशमुखांच्या जागी सुहास दिवसे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोपवला आहे. आपल्या पदाचा पदभार राजेश देशमुख यांच्याकडे सोपवावा आणि त्यांच्याकडील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी हे आदेश काढले आहेत.

सुहास दिवसेंचा क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदाचा कार्यकाळ संपला होता, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा होती. याशिवाय ते पुणे महापालिका आयुक्त होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र अजितदादांनी त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

दिवसे यांनी ठाकरे सरकारच्या काळात पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त म्हणून काम केले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दिवसे ओळखले जातात. त्यानंतर दरम्यानच्य काळात राज्यात सत्तांतर होऊन त्यांना क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपद देण्यात आले. पण आता अजित पवारांनी दिवसेंना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज