मुंब्र्याच्या उपटसुंबाला काही कामधंदे राहिलेले नाहीत; मिटकरींची आव्हाडांवर बोचरी टीका

  • Written By: Published:
मुंब्र्याच्या उपटसुंबाला काही कामधंदे राहिलेले नाहीत; मिटकरींची आव्हाडांवर बोचरी टीका

Amol Mitkari : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. निवडणुक आयोगाच्या या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनीही निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी केलेला कट असल्याची टीका केली. या टीकेला आता आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं.

Safe Internate Day निमित्त युनिसेफचा राष्ट्रीय राजदूत म्हणून आयुष्मान खुरानाकडून जनजागृती 

आज माध्यमांशी बोलतांना मिटकरींनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना आमदार आव्हाड यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, अजित पवारांना कायम विरोध करणाऱ्या काही उपटसुंबाना कामधंदे राहिलले नाहीत. संजय राऊत म्हणा किंवा मुंब्य्राचे भाई म्हणा… या सगळ्यांना कामधंदे राहिलेले नाहीत. त्यामुळं त्यांना काय बडबड करायची ती करू द्या… आमच्याकडे 50 आमदार आहेत. आगामी काळात आमच्या आमदारांची संख्या आणखी वाढणार आहे. जे उरले सुरलेले आमदार आणि खासदार आहेत, ते देखील आमच्याकडे येतील, असं मिटकरी म्हणाले.

अरविंद केजरीवाल हाजीर हो! दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर कोर्टाने पाठवले समन्स 

मिटकरी पुढं बोलतांना म्हणाले की, शरद पवार गटाचे सहा नेते लवकरच आमच्याकडे येणार आहेत. काही जणांसाठी मंत्रीपदेही ठेवण्यात आलेली आहेत, असं मिटकरी म्हणाले.

दुसरा अमोलही येणार आहे. मी आधी सांगितले होते की, अमोल कोल्हे यांनी मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. आता तर आमच्याकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह आहे. त्यामुळे अमोल कोल्हे अधिकृतपणे आमच्यासोबत आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, असंही मिटकरी म्हणाले.

आव्हाड काय म्हणाले?
कालचा निर्णय वाचल्यानंतर काही धक्कादायक बाबी समोर येतात. अजित पवार यांची निवड चुकीची असल्याचे स्पष्ट केलं आहे. 2019 मध्ये अजित पवार वेगळे झाल्यानंतर हा वाद सुरू झाल्याचे या निर्णयात म्हटले आहे. मात्र, काका मोठ्या मनाचे असल्याने 2019 ला पक्ष फुटल्यानंतर त्यांना पुन्हा कुशीत घेतलं. परत बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केलं, असं आव्हाड म्हणाले.

शरद पवार यांची राजकीय हत्या करण्याचा अजित पवार तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाचा कट असल्याचं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. पर्याय देऊनही केंद्रीय निवडणूक आयोग खोटे बोलत असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज