शरद पवार गटाला नावं मिळालं पण ‘वटवृक्ष’ चिन्हाचं काय? EC ने निर्णय राखून ठेवला

शरद पवार गटाला नावं मिळालं पण ‘वटवृक्ष’ चिन्हाचं काय? EC ने निर्णय राखून ठेवला

NCP Sharad Pawar party Symbol : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. दरम्यान, पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आज तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून मागणी केली होती. त्यानंतर लगेचच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने नावं बहाल केलं मात्र, अद्याप वटवृक्ष चिन्हाबाबत आयोगाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे वटवृक्ष चिन्ह मिळावे अशी आग्रही मागणी करण्यात येत होती.

Hrithik Roshan War: हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ संदर्भात चाहत्यांना दिली गूडन्यूज, म्हणाला…

राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्हे सुचवण्यासाठी आजचा वेळ दिला होता. त्यानूसार शरद पवार गटाने आज आपल्या गटाची तीन नावे आणि चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. यामध्ये नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, दुसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार अशी तीन नावे शरद पवार गटाकडून देण्यात आली. तर वटवृक्ष चिन्ह देण्यात यावं, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

विशेष म्हणजे शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या तिनही नावांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. एका नावात नूसतं शरद पवार तर दुसऱ्या नावांमध्ये शरदचंद्र पवार आणि तिसऱ्या नावामध्ये शरदराव पवार अशा नावाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, पक्षाच्या नावाच्या सुरुवातीला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नोंदणीकृत नाव आहे तसंच ठेवण्यात आलं.

निवडणूक आयोगाकडून काल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला तर दुसरं म्हणजे पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देखील अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं आहे. यावेळी निर्णय देताना निवडणूक आयोगाने बहुमताचा विचार करुनच निर्णय दिला असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शरद पवार गटाने तीन नावे आणि चिन्ह देण्यात यावं, असे निर्देश आयोगाकडून काल देण्यात आले होते.

Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

सध्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाल संपला असून निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही जोरदार हालचाली सुरु आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्याने शरद पवार गटाने आपली तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे मागणी केली. त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून यावर निर्णय घेतला आहे. कारण उद्यापासून राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार असल्याने निवडणूक लवकरच निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव दिलं मात्र चिन्हाबाबत अद्याप निर्णय राखून ठेवला आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीबाबत निर्णय दिला होता. त्यावेळी शिवसेना पक्षाचं नाव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव ठाकरे गटाला देण्यात आलं होतं. तर मशाल चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. आत्ताही राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नाव देण्यात आलं मात्र, अद्याप चिन्ह बहाल करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता पुढील काळात उद्धव ठाकरे गटासारखंच शरद पवार गटाचंही हेच नावं राहणार का? आयोगाकडून जे चिन्ह देण्यात येईल तेच चिन्ह राहणार? असे प्रश्न उपस्थित केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज