Khelo India Youth Games : महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

Khelo India Youth Games : महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला

मध्यप्रेदश : महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या (khelo india youth games) पाचव्या पर्वात १६१ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. (maharashtra ) तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद महाराष्ट्राने पटकावले. (champion ) याअगोदर २०१९ पुणे आणि २०२० आसाम या ठिकाणी महाराष्ट्र विजेते ठरले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३ सुवर्ण आणि प्रत्येकी १ रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची यावेळी कमाई केली. कुस्तीत नरसिंग पाटील ब्रॉंझपदकाचा पहिला मानकरी ठरला.

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अपेक्षाने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत ३३.९२ सेकंदात जिंकली. तर मुलांच्या ५० मीटर फ्री- स्टाईल शर्यतीत जयवीर मोटवानीने २४.३२ सेकंद वेळ देत सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धा प्रकारात अर्जुनवीर गुप्ता रौप्यपदकाचा मानकरी यावेळी ठरला. महाराष्ट्राला आजचे आणि स्पर्धेतील शेवटचे सुवर्णपदक ४ बाय १०० मीटर फ्री- स्टाईल रिले शर्यतीत मुलांनी मिळवून दिले. या संघात ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन या खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिट ३७.६५ सेकंद अशी वेळ दिली. मुलींच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात धृती अग्रवाल तिसरी नंबर पटकावला आहे. तिने २ मिनिटे २८.६७ सेकंद अशी वेळ दिली.

कुस्तीत नरसिंग पाटील ला ब्रॉंझ पदक

महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेतील कुस्तीमध्ये शेवटच्या दिवशी एका ब्रॉन्झपदकाची कमाई झाली. कोल्हापूरच्या नरसिंग पाटील याने फ्री स्टाईल विभागात ५५ किलो गटात हे यश प्राप्त केले. त्याने राजस्थानच्या अनुज कुमार याच्यावर खतरनाक विजय मिळविला. उपांत्य फेरीत त्याला राजस्थानच्या ललित कुमार याच्याकडून पराभव स्वीकारला होता. नरसिंग हा बेळगाव येथील आर्मी बॉईज इन्स्टिट्यूटमध्ये सराव करत आहे.‌ महाराष्ट्राला कुस्तीमध्ये यंदा २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांची कमाई करण्यात आली.या स्पर्धेत महाराष्ट्राला योगासन, तलवारबाजी या क्रीडा प्रकारात मोठे यश मिळाले. मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू जोरदार चमकले. जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने आपली चांगली आणि मोठी छाप पाडली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळेने आपला घवघवीत ठसा उमटविला. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, नेमबाजी या खेळात मोठे यश मिळविले आहे.

२० क्रीडा प्रकारात पदक

महाराष्ट्राने स्पर्धेत २२ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यापैकी २० क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किमान एक तरी पदक हाती लागला. परंतु कलरीपटायु आणि गतका या दोन खेळामध्ये महाराष्ट्र पदक मिळवू शकला नाही.

महाराष्ट्राची शान उंचावली- देओल

महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून मोठी कामगिरी केली. या कामगिरीमुळे महाराष्ट्राची शान उंचावली आहे आणि महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंच्या पुढे त्यांची ही कामगिरी आदर्श ठरणार आहे, असे राज्याच्या क्रीडा आणि युवक खात्याचे सचिव रणजीत सिंह देओल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र संघाच्या या विजयात संघातील सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक सर्व जिल्हा व राज्य संघटक खेळाडूंचे आणि त्यांच्या सर्व पालक वर्गाचा मोठा वाटा आहे.

या कामगिरीने भारावून गेलो- डॉ. दिवसे 

आमच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे.‌ खेळाडूंच्या या कामगिरीने मी अतिशय भारावून गेलो असल्याचे डॉ. दिवसे यांनी यावेळी सांगितलं.‌ हरियाणाच्या तुलनेत आमच्या पथकात कमी खेळाडू होते, तरी देखील आमच्या खेळाडूंनी क्षमतेच्या १००% उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून दिले आहे. महाराष्ट्राचे हे यशस्वी खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तम चमक दाखवणार आणि ऑलिंपिक सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचावतील, अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube