Download App

Pune Metro : पंतप्रधानांनी केलं पुणे मेट्रोचं लोकार्पण; कसे असणार तिकीट दर? जाणून घ्या…

Pune Metro Tickets rate : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्याआधी पुण्यात दाखल झाल्यानंतर मोदींच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात पुजा आणि अभिषेक करण्यात आला. (PM Modi inaugurate Pune Metro to know Pune Metro Tickets rate )

चर्चा तर होणारचं! मोदींचं जीव तोडून भाषण, CM शिंदेंची ब्रह्मानंदी टाळी अन् बरचं काही

यावेळी मोदींच्या हस्ते पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आमि रूबी हॉल ते गरवारे या दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण झालं. दे दोमन मार्ग महत्वाचे आहेत. यामुले पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रूबी हॉल या मार्गावर प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. मात्र या मार्गावर प्रवास करताना तिकीट दर किती असणार याबद्दल जाणून घेऊ…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीकविम्याच्या अर्जाबाबत मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा…

असे असणार पुणे मेट्रोचे तिकीट दर…

या मेट्रोचे किमान भाडे 10 रूपये तर कमाल भाडे 35 रूपये असणार आहे. तर पीसीएमसी ते वनाझ हा प्रवास करण्यासाठी 40 मिनिट लागणार आहेत. त्यासाठी 35 रूपये भाडे असेल तर पीसीएमसी ते रूबी हॉल 30 रूपये भाडे असणार आहे. वनाझ ते रूबी हॉल साठी 35 रूपये भाडे असेल, तसेच यात विद्यार्थ्यांना या भाड्यामध्ये 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी सर्व नागरिकांना 30 टक्के सवलत असणार आहे. तर मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट 10 टक्के सवलत असणार आहे. मेट्रो कार्ड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

पुणे मेट्रोचे वैशिष्ट्ये…

तिकीट दराबरोबरच पुणे मेट्रोचे काही वैशिष्ट्ये देखील असमार आहेत. त्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. तर गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहे. तर 12 ते 4 या वेळेमध्ये दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर आणि जलद होणार आहे.

दरम्यान पुण्यात पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो या दोन कंपन्या अनुक्रमे पिंपरी-चिंचवड मनपा ते स्वारगेट हा 16.59 किमीचा तर पीएमआरडीए वनाझ रामवाडी हा 14.66 किमीचा मार्ग तयार करत आहेय तसेच पीएमआरडीए राजीव गांधी हिंडजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालाय हा 23.33 किमीचा मार्ग देखील करत आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज