शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीकविम्याच्या अर्जाबाबत मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा…
पीक विमासंदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. पीक विम्याच्या घोषणेबाबतची माहिती मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणीयेत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती करुन मुदतवाढ केली आहे.
भिडेंवर आधीच कारवाई झाली असती तर आज बोलले नसते; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल
पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एक रुपयात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
या योजनेमध्ये राज्यातील 1.50 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर मागील 24 तासांत 7.20 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व इतर तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्र सरकारकडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.