भिडेंवर आधीच कारवाई झाली असती तर आज बोलले नसते; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल
Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आहेत. यापूर्वीच नको ते बोलणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई झाली असती तर भिडे महात्मा गांधींवर आता बोललेच नसते, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवरच निशाणा साधला.(Prakash Ambedkar Criticize on Sambhaji Bhide devendra Fadnavis RSS BJP)
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अर्धवट कारवाई करुन सोडून देण्याचे जे राजकारण सुरु आहे, ते सोडून दिले पाहिजे, अशी माझी विनंती आहे. जिथं जिथं समाजामध्ये दुभगलेपणा येणार आहे असे वाटते, त्या दुभगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना आहे ती आपण केली पाहिजे असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले की, संभाजी भिडेंचा आणि भाजपचा संबंध नाही, तसं मला देवेंद्र फडणवीसांना विचारायच्या आहेत की, आरएसएसच्या 61 हजार वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्याशी तुमचा संबंध नाही असं तुम्ही जाहीर करा मग मी त्या कॅप्चर करायला सुरुवात करतो, असे स्पष्टपणे सांगितले.
आरएसएस बीजेपीने कितीही डेव्हलपमेंटल अजेंडा म्हटला तरी त्यांचा जो कोअर इश्यू आहे तो त्यांनी सोडला नाही. त्यांचा जो कोअर इश्यू आहे तो इथल्या अल्पसंख्यांकांशी संबंधित आहे. इथल्या आदिवासींच्या संबंधातला आहे. ज्या-ज्या वेळी त्यांना संधी मिळते तेव्हा ते तो अजेंडा राबवतात, अशी परिस्थिती असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.