Pune Politics : अजित पवारांना घेरता घेरता, दादांनी लावला भाजपचेच मोहरे पळवण्याचा सपाटा

पुणे महानगर पालिकेत सत्तेत एकत्र असूनही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Pune Politics : अजित पवारांना घेरता घेरता, दादांनी लावला भाजपचेच मोहरे पळवण्याचा सपाटा

Pune Politics : अजित पवारांना घेरता घेरता, दादांनी लावला भाजपचेच मोहरे पळवण्याचा सपाटा

BJP Leader Shard Butte Patil Meets Ajit Pawar : पुणे महानगर पालिकेत सत्तेत एकत्र असूनही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचे पाहण्यास मिळत आहे. एकीकडे 70 हजार कोटींचा घोटाळा असो किंवा अन्य मुद्द्यांवरून भाजपकडून दादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दादांना घेरता घेरताच अजित पवारांनी भाजपचे मोहरे पळवण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. त्यामुळे पुण्याच्या रणांगणात दादांनी आता फासे आवळायला सुरूवात केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर दादांनी भाजपातील हुकमी एका असणाऱ्या नेत्यासोबत गुप्त बैठक केल्याचे सांगितलं जातयं. त्यामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO : पुणे मेट्रो मोदींमुळेच सुस्साट धावली; अजितदादांना मोदींच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही का? मोहोळ थेट बोलले…

गुप्त बैठक झालेला नेता कोण?

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची आणि अजितदादांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे समोर येत आहे. काल (दि.8) रात्री पुण्यात जिजाई निवासस्थानावर अजित पवारांसोबत ही भेट झाल्याचे सांगितलं जातयं. दादांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली किंवा ही भेट कोणत्या कारणासाठी होती हे जरी समोर आलेले नसले तरी, ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर बुट्टे पाटील 11 वर्षांनंतर पुन्हा “स्वगृही” परतणार का? यावर संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

‘त्या’ नाराजीमुळे बुट्टे पाटलांनी राष्ट्रवादीला केला होता रामराम

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून बुट्टे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. पदवीधर निवडणुकीत संधी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. याच नाराजीनंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांनी 2014 विधानसभाही लढवली होती.

Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड भाजपाला सोपं नाही : अजित पवारांनी लावली जोरदार फिल्डिंग

त्यानंतर आता पुन्हा बुट्टे पाटील जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. बुट्टे पाटलांच्या राष्ट्रवादीतील पुन्हः प्रवेशासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी सक्रीय भूमिका घेतल्याचेही सांगितले जात आहे.

VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर

दादांची ताकद वाढणार अन् राजकारण तापणार

एकूणचं काय तर, भ्रष्ट्राचार असो किंवा अन्य मुद्द्यांवरून भाजप दादांना घेरण्याच्या प्रयत्नात असताच दादांनी फास टाकत झेडपी निवडणुकांच्या तोंडावर हुकमी एक्का असलेल्या बुट्टे पाटलांनाच गळाला लावत त्यांच्यासोबत गुप्त बैठकही घेऊन टाकली आहे. या बैठकीनंतर भाजपला जोरदार धक्का बसला असून, ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत खेड तालुक्यातील राजकारणाला मोठं वळण मिळणार असून, अजितदादांची बालेकिल्ल्यात ताकद वाढणार आहे.

Exit mobile version