पीएमआरडीएचा मोठा निर्णय! 7 ते 10 दिवसांची प्रतीक्षा संपणार, 3 महत्त्वाची प्रमाणपत्रे आता काही सेकंदांत ऑनलाइन

PMRDA GIS Geoportal: जीआयएस-आधारित जिओपोर्टलवरून झोन प्रमाणपत्र, पार्ट प्लॅन आणि साईट एलिव्हेशन प्रमाणपत्र काही सेकंदांत ऑनलाइन मिळणार आहेत.

PMRDA GIS Geoportal Pune

PMRDA GIS Geoportal Pune

PMRDA GIS Geoportal Pune: पुणे : नागरिकांना शासकीय सेवा जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) जीआयएस-आधारित जिओपोर्टल सुरू केले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ आणि शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) उपक्रमांतर्गत विकसित केलेल्या या पोर्टलवरून झोन प्रमाणपत्र, पार्ट प्लॅन आणि साईट एलिव्हेशन प्रमाणपत्र काही सेकंदांत ऑनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना पीएमआरडीए कार्यालयात वारंवार जाण्याची किंवा पाठपुरावा करण्याची गरज कमी होणार आहे.

उद्धव ठाकरेंना दिवाळीत मोठा धक्का? विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले, नगरसेवकपदाबाबत पुढे काय?

यापूर्वी झोन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 7 दिवस, पार्ट प्लॅनसाठी 3 दिवस, तर साईट एलिव्हेशन प्रमाणपत्रासाठी 10 दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. प्रादेशिक योजनेचे कागदी नकाशे तपासण्याच्या प्रक्रियेमुळे ही कामे वेळखाऊ ठरत होती. मात्र, पीएमआरडीएने 1997 मध्ये मंजूर झालेल्या पुणे प्रादेशिक योजनेचे (RP) डिजिटायझेशन करून ती जीआयएस प्रणालीशी जोडली आहे.

तसेच, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, टोपोशीट्स आणि आधुनिक भौगोलिक माहितीच्या आधारे साईट एलिव्हेशन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियाही स्वयंचलित केली आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय ही प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळू शकणार आहेत. विशेष म्हणजे, झोन प्रमाणपत्रासोबतच पार्ट प्लॅनही उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्रमाणपत्रांसाठी करावी लागणारी प्रतीक्षाही संपणार आहे.

चंद्रकांत पाटलांची निवड योग्य ठरली… भाजपसाठी अवघड मतदारसंघात गुलाल

या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून, कार्यालयात जाण्यासाठी होणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. प्रमाणित जीआयएस लेयर्सच्या वापरामुळे मानवी चुका आणि अनावश्यक हस्तक्षेप कमी होण्यास मदत होईल. तसेच, प्रत्येक प्रमाणपत्रावर क्यूआर कोड आणि बारकोड देण्यात येणार असल्याने त्याची सत्यता कुठूनही डिजिटल पद्धतीने तपासता येईल. नागरिकांना पोर्टल वापरण्यास अडचण येऊ नये, यासाठी ऑनलाइन मार्गदर्शन, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि अभिप्राय नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पीएमआरडीएच्या जिओपोर्टलवर 674 गावांच्या हद्दी, मेट्रो मार्ग, टीओडी झोन, पुरंदर विमानतळाचे बाधित क्षेत्र, एनडीए बफर झोन, हेमरल (HEMRL) सीमा, वन्यजीव अभयारण्ये, रेल्वेमार्ग आणि पूररेषा (रेड लाइन व ब्लू लाइन) अशा 25 हून अधिक महत्त्वाच्या भौगोलिक आणि प्रशासकीय स्तरांवरील माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

“ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर ठाण्यातून परत जाणार नाही, ही धमकीच समजा” ; नरेश म्हस्केंचा विरोधकांना इशारा

या एकत्रित आणि अचूक माहितीमुळे अधिकाऱ्यांचा नियमित कामकाजातील वेळ वाचणार असून, तांत्रिक तपासणी आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांवर अधिक लक्ष देता येणार आहे. पीएमआरडीएचे हे जीआयएस जिओपोर्टल मॉडेल राज्यातील इतर प्रादेशिक विकास आणि विशेष नियोजन प्राधिकरणांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते.

“पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील नियोजन आणि विकास प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे जीआयएस-आधारित सार्वजनिक पोर्टल एक महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांना आता त्यांच्या भूखंडाच्या परिसरातील रस्ते, पूररेषा, मेट्रो मार्ग आणि प्रादेशिक नियोजनासंबंधीची अधिकृत प्राथमिक माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच, या पोर्टलद्वारे ‘झोन प्रमाणपत्र’, ‘पार्ट प्लॅन’ आणि ‘साईट एलिव्हेशन प्रमाणपत्र’ ऑनलाइन विनाविलंब उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचेल आणि शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्याची गरज कमी होईल. डिजिटल गव्हर्नन्सला चालना देऊन पारदर्शक, गतिमान आणि सुलभ प्रशासन देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ कटिबद्ध आहे.” असा विश्वास पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.

Exit mobile version