Osho Ashram Pune : ओशो अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार; गेट तोडून आश्रमात केला होता प्रवेश

पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश […]

osho ashram pune

osho ashram pune

पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

आचार्य रजनीश ओशो यांचा काल ७० वा संबोधी दिवस साजरा झाला. याच निमित्ताने जगभरातील ओशोंचे हजारो अनुयायी कोरेगाव पार्क येथील आश्रम परिसरात दाखल झाले. मोठ्या प्रमाणावर अनुयायी एकत्रित आल्याने त्यांनी ओशो आश्रमात सुरक्षारकांना डावलून प्रवेश मिळवला, त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

गेल्या काही दिवसापासून ओशो आश्रमात होत असलेल्या भ्रष्टाराच्याविरोधात ओशोंच्या अनुयायांकडून आंदोलन सुरु आहे. तसेच या अनुयायांना आश्रमात जाऊ दिलं जात नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून आश्रमाबाहेर त्यांचं आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काल त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते. त्यातून हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

चिंचवडमध्ये सफाई कामगार महिला आणि मालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

 

Exit mobile version