चिंचवडमध्ये सफाई कामगार महिला आणि मालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

  • Written By: Published:
चिंचवडमध्ये सफाई कामगार महिला आणि मालकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

पिंपरी चिंचवड शहरातील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये एक सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर मालकावर गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड येथे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेला तीन महिन्यापासून पगार वेळेवर मिळाला नाही म्हणून ती महिला मालकांकडे पगार मागण्यास गेली होती. त्यावेळी वाद झाल्यामुळे तिने आपल्या मालकाला सुरुवातीला मारहाण केली आहे. मात्र त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफिस मालकाच्या भावाने देखील सफाई कामगार महिलेला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली आहे. या घटनेत बबीता महेंद्र कल्याणी ही सफाई कामगार महिला रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली आहे.

शासकीय निवासस्थानी ‘गुढी’ उभारत अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा…

आज सकाळी निगडी भागातील सिटी प्राइड कॉम्प्लेक्स या ठिकाणीही घटना घडली आहे. सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये एस आर सी नावाचा ट्रान्सपोर्ट अमजद खान नामक व्यक्ती चालवतात, त्याच ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये अमजद खानचा भाऊ हर्षद खान देखील बसतो आणि त्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये बबीता महेंद्र कल्याणी ही महिला सफाई कामगार म्हणून काही महिन्यापासून काम करत आहे. मात्र तिला मागील तीन महिन्यापासून वेळेवर पगार मिळाला नसल्याने तिने आपल्या ट्रान्सपोर्ट मधील मालकाच्या भावाला सुरुवातीला पगाराविषयी विचारपूस केली.

त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ वादाला सुरुवात झाली आणि या वादातून बबीता महेंद्र कल्याणी हिने सुरुवातीला हर्षद खानला मारहाण केली. त्यानंतर हर्षद खाने देखील प्रतिउत्तरा खातिर बबीता महेंद्र कल्याणी ह्या सफाई कामगार महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणात निगडी पोलीस स्टेशनमध्ये बबीता महेंद्र कल्याणी हिच्या फिर्यादीवरून हर्षद खान विरोधात भादवी 323, 504, 506 कलमा नुसार सध्या अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

तेलंगणासह गडचिरोली, चंद्रपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube