बदली झाली नाही म्हणून थेट आयुक्तांच्या बंगल्यावर कार, पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलचा राडा

बदली न झाल्याच्या रागातून एका पोलीस कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात कार घुसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

Untitled Design   2026 11 04T123714.122

Untitled Design 2026 11 04T123714.122

Police constable creates a ruckus in Pune : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याच्या रागातून एका पोलीस कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात कार घुसवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, संबंधित कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भिसे असे या कॉन्स्टेबलचे नाव असून, ते पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस दलात नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदली प्रक्रियेदरम्यान अमोल भिसे यांना पुणे शहरातील एका विशिष्ट पोलीस ठाण्यात नियुक्ती हवी होती. त्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या बदलीच्या यादीत त्यांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

बदलीयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला संताप मनात ठेऊन भिसे यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानाकडे मोर्चा वळवल्याची माहिती आहे. त्यांनी आपल्या ताब्यातील कार घेऊन पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक दिली. त्यानंतर कारसह बंगल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सुप्रिया अन् आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशिर्वाद द्या…PM मोदींचा शरद पवारांना फोन

या घटनेमुळे काही काळ बंगल्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित कॉन्स्टेबलला रोखण्यात आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी अमोल भिसे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बदली न झाल्याच्या नाराजीतून त्यांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांच्या मद्यप्राशनाबाबत तसेच घटनेमागील नेमक्या कारणांबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

या प्रकरणी अमोल भिसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. कारने बंगल्याच्या प्रवेशद्वाराला धडक देण्यामागे नेमका काय उद्देश होता, त्यांनी जाणूनबुजून हा प्रकार केला का, तसेच या घटनेच्या वेळी ते नेमक्या कोणत्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेत होते, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, या घटनेने पुणे पोलीस दलातील अंतर्गत शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून कायद्याचे पालन करून घेण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली जाते, त्यांच्याच शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रकार घडल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

‘कितीही बदनाम करा फरक पडणार नाही’…सहर शेखची ‘औरंगजेबा’च्या समर्थनात पोस्ट, नव्या वादाला तोंड?

पोलीस दलातील बदली प्रक्रिया, कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारी नाराजी हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, बदली न झाल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बदलीच्या नाराजीतून थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्यापर्यंत धडक देणाऱ्या या कॉन्स्टेबलच्या कृत्यामुळे पुणे पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version