Download App

ललित पाटीलचा ‘एक्झिट प्लॅन’ यशस्वी करणाऱ्या दोघांना अटक : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे (Pune) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयातून पलायन करण्यास ललित पाटील (Lalit Patil) याला मदत केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि नाशिक येथील एका सराफ व्यवसायिकाला अटक केली आहे. (Police have arrested two people on the charge of helping drug smuggler Lalit Patil to escape from Sassoon.)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांच्या बँकेतून 20 कोटी 44 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी आणि ती रक्कम इतर कामासाठी वापरल्याच्या आरोपावरून ईडीने अऱ्हानाला यापूर्वी अटक केली होती. येरवडा कारागृहात असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 16 मध्ये ललित आणि अऱ्हाना यांची ओळख झाली.

Punit Balan : कोट्यवधींच्या नोटीशीला पुनीत बालन यांचे खरमरीत प्रत्युत्तर

या ओळखीतून अऱ्हानाने ललितला पळून जाण्यास मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी अऱ्हानाचा ताबा घेण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करत न्यायालयाने पोलिसांना येरवडा कारागृहातून त्याचा ताबा घेण्याची परवानगी दिली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक केली.

ससून रुग्णालयामधून पळाल्यानंतर ललित पाटील काही अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. तेथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिछे दत्ता डोके हा ललितला घेऊन जाण्यासाठी गाडी घेऊन थांबला होता. ही गाडी डोकेच्या नावावर आहे. परंतु तो अऱ्हानाकडे चालक म्हणून कामाला आहे. याच गाडीतून ललित रावेतला पोचला. तेथे डोके याने अऱ्हानाच्या सांगण्यावरून ललितला 10 हजार रुपये दिले.

पुणेकरांच्या संतापाला आवरा! पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग

हे पैसे घेऊन ललित पाटील पहिल्यांदा मुंबईला गेला. तिथून नाशिकला गेल्यानंतर मैत्रिणीकडून 25 लाख रुपये घेऊन तो पसार झाला. यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात सोनेही सोबत नेले होते. हेच सोबत नेलेले सोने ललित पाटीलने ज्या सराफ व्यावसायिकाकडून खरेदी केले त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्जच्या पैशांतून सोने घेण्यासाठी या सराफ व्यावसायिकाने मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Tags

follow us