पुणेकरांच्या संतापाला आवरा! पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग

  • Written By: Published:
पुणेकरांच्या संतापाला आवरा! पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून शुल्लक कारणांवरून नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता पिझ्झा डिलिव्हरीस उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने संबंधित डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोहित राजकुमार हुलसुरे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Men Beat Pizza Delivery Boy In Pune Wagholi Area )

Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! आजपासून जरांगे पाटील पुन्हा मैदानात, ठिकठिकाणी आंदोलन

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याजवळील वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या चेतन वसंत पडवळ यांनी काल (दि.24) रात्री ऑनलाईन पिझ्झाची ऑर्डर केली होती. मात्र, ही ऑर्डर पोहचवण्यास रोहित यांना उशीर झाला. यामुळे चिडलेल्या पडवळ यांनी डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पडवळ यांनी हवेत गोळीबार केला.

या घटनेनंतर माहाराणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर सहकारी पडवळ यांच्या घरी गेले असता या सर्वांना आरोपीने मारहाण केली तसेच कारमधून पिस्टल काढून हवेत फायरिंग केली. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय‌.

Maratha Reservation : ‘ट्रिपल इंजिन सरकारच आरक्षण देणार’; गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं

शुल्लक कारणावरून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ 

गेल्या काही दिवसांपासून गाडी चालवताना कट मारून गेला यासह अनेक शुल्लक कारणांवरून शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये शाब्दिक चकामकीपासून हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. यात काही जणांना कोणतेही कारण नसताना मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. मात्र, शुल्लक कारणांमुळे होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात काल वाघोली परिसरात घडलेल्या घटनेनंतर पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पडवळ यांनी ज्या बंदुकीतून हवेत फायरिंग केले. त्याचा परवाना त्यांच्याकडे होता का? ती गन त्यांचीच होती की आणखी कुणाची होती यासर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube