Download App

सत्ता येते अन् जाते पण समाज, देश इथेच राहतो; पंतप्रधान मोदींचा मराठीतून टोमणा…

Pm Narendra Modi Pune Tour : सत्ता येते आणि जाते पण समाज, देश इथेच राहतो, त्यामुळेच उद्याचं भविष्य चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांना मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यानंतर पुण्यातील दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं आहे.

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ; रोहित पवारांच्या मागणीची अजितदादा अन् मुंडेंकडून दखल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सत्ता येते अन् जाते पण समाज, देश इथेच राहत आहे, त्यामुळेच लोकांच उद्याचं भविष्य चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हाच उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्रातील विविध पक्ष सोबत येत विकासाचं काम करीत आहेत. सर्वांच्या सहभागाने महाराष्ट्राचा वेगाने विकास होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

तसेच पुणे शहराचं प्रदुषण रोखण्यासाठी मेट्रोचा विस्तार होणं गरजेचं आहे. एकीकडे महाराष्ट्राचा विकास सुरु आहे तर दुसरीकडे दुसऱ्या राज्यांमध्ये काय सुरु आहे, हे आपण डोळ्याने पाहत आहोत. देशातील कर्नाटकासह राजस्थानाचा विकास खुंटत चालला आहे. या राज्यांवर कर्जाचा भार वाढतच चालला असल्याची टीकाही त्यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या विकासावर केली आहे.

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

तसेच देशाचा विकास होण्यासाठी सरकारमध्ये निती, नियत आणि निष्ठेची गरज असते. देशातल्या प्रत्येक राज्यांचा विकास हा सरकारच्या नीती नियत आणि निष्ठेवरुन ठरतो. 2015 साली आम्ही सत्तेत आल्यानंतर योग्य नियतीनूसार काम केलं. देशातल्या ग्रामीण भागांत जवळपास 4 कोटींपेक्षा अधिक घरे बांधली असल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं आहे.पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच महिलांच्या नावावर मालमत्ता रजिस्टर झाली, याचा अभिमान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक स्वप्नांना पूर्ण करण्याची मोदीची गॅरंटी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी जनतेला दिला आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच प्रेम आणि आशिर्वाद दिलं असल्याचंही ते म्हणाले.

Tags

follow us