गेल्या काही दिवसांपूर्वी बारावीच्या बोर्डाचा पेपर फुटला होता. त्यानंतर आता विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये दहावीचा पेपर फुटला आहे. पुण्यात गणित भाग एकचा पेपर फुटला आहे. एका महिला सुरक्षा रक्षाकाचा फोनमध्ये हा पेपर आढळून आला आहे. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये एका महिला सुरक्षा रक्षकाच्या फोनमध्ये हा फोटो आढळला आहे. त्यानंतर या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनीषा कांबळे असे या महिलेचे नाव आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यासाठी परवानगी नसताना देखील या महिलेने परीक्षा केंद्रावर मोबाईल नेला होता.
12th Paper Leak : केवळ गणितच नव्हे तर, फिजिक्स अन्… ; गुन्हे विभागाच्या माहितीने खळबळ
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दहावी व बारावीचे पेपर सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी बारावीचा पेपर फुटला होता. त्यानंतर आता पुण्यामध्ये पेपर फुटीची घटना घडली आहे. 13 मार्च रोजी गणित भाग एकचा पेपर होता. तेव्हा कांबळे यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपरचे फोटो काढले. त्यानंतर 15 मार्च रोजी परीक्षा केंद्रावर बोर्डाचे पथक आले असता त्यांच्या संशय कांबळे यांच्यावर गेला. यानंतर त्यांनी या सुरक्षा रक्षक महिलेची चौकशी केली.
यानंतर त्या सुरक्षा रक्षक महिलेच्या फोनमध्ये पेपरचे फोटो आढळले. या महिलेने अगोदर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. यानंतर बोर्ड पथकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात या महिलेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Telegram App : टेलीग्रामचे युझर्ससाठी नवे फीचर्स, तुम्हीही वापरू शकता
दरम्यान, बारावी पेपर फुटी प्रकरणी आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचाही पेपर फुटला होता, अशी खळबळजनक माहिती क्राईम ब्रांचनं दिली आहे. 27 फेब्रुवारीला फिजिक्स तर 1 मार्चला केमेस्ट्रिचा पेपर फुटल्याचं क्राईम ब्रांचनं म्हटले आहे. या पेपरफुटी प्रकरणावरुन विधीमंडळात देखील खडाजंगी होण्याची शक्यता आहे.