पुणे : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण सोशल मीडियाच्या (Social Media) आधीन झाली आहेत. त्यात अनेक लहान मुलांना ऑनलाईन गेमिंगचा (Online Game) नाद लागला आहे. याच नादातून पिंपरी-चिंचवडमध्ये एका 15 वर्षीय मुलाने 14 व्या मजल्यावररून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पालकांनी किती सजग राहणे गरजेचे झाले आहे हे अधोरेखित झाले आहे. 26 जुलैच्या रात्री नेमकं काय घडलं याचाच आढावा घेणारी ही बातमी.
शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान
शांत संयमी मुलगा झाला हिंसक
दहावीत शिकणाऱ्या आर्याला गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येनं झाला. या 16 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 26 जुलैच्या रात्री पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली.
आत्महत्या केलेला मुलगा अतिशय हुशार, शांत आणि संयमी होता. एवढेच काय तर, त्याला 9 वी चांगले मार्क पडले होते. मात्र, दहावीत गेल्यानंतर त्याला ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. तो त्याच्या इतका आहारी गेला की, इतरवेळी वडिलधाऱ्या व्यक्तींना घाबरणारा आर्या मुलगा थेट किचनमधील सुरूची मागणी करू लागला होता. त्याच्यातील हा बदल पाहून त्याचे पालकही चिंतेत होते.
उडी मारून जीवन संपवणाऱ्या आर्याचे वडील परदेशात एका कंपनीत नोकरीला आहेत तर, आई गृहिणी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आर्या ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. अनेकदा तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत एकटाच बडबड करत असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.
भारतात व्हॉट्सअप बंद होणार? मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं..
26 जुलैच्या रात्री नेमकं काय घडलं?
दरम्यान, 25 जुलैला पावसामुळे पुणे आणि जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी देण्यात आली होती. त्या दिवशी 16 वर्षीय आर्याला आईने रात्रीच्या जेवणासाठी अनेक विनवण्या केल्या. त्यानंतर तो रूमच्या बाहेर आला. जेवण केले आणि तो पुन्हा खोलीत जाऊन बसला. तर, आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होते.
काही केल्या मुलाचा ताप कमी होत नसल्याने आर्याची आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज आर्याच्या आईने वाचला अन् त्या ताडकन मोठ्या मुलाच्या रूमकडे धावल्या पण, मुलगा घरात नव्हता. त्यानंतर त्या धावाधाव करत जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचल्या त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनचं सरकली कारण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मुलगा त्यांचाच होता. मुलाला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
कागदावर आढळलं कोडिंग
या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे या मुलाने आत्महत्या का केली याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांना एका कागदावर गेममधील कोडिंग आढळून आले आहे. यात संबंधित मुलाला एक टास्क देण्यात आला होता. कागदावर त्याच्या घराचा नकाशा होता आणि त्याला गॅलरीत डासांसाठी लावलेली जाळी तोडून खाली उडी मारण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार आर्याने रात्री 12.30 च्या सुमारास 14 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.
…म्हणजे कोवळे जीव वाचतील
या धक्कादायक घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच पीडित मुलाच्या पालकांनी सरकारने आशा ऑनलाईन गेमिंगवर आळा घालण्याची मागणी केली आहे. ‘नॉन ट्रॅडिशनल वॉरफेअर’ पद्धतीनुसार गेमिंगच्या माध्यमातून तरुण पिढी संपवण्याचा हा डाव असून, हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गेम इंडियन सर्व्हरला कनेक्टच होऊ नये, जेणेकरून माझ्या मुलाप्रमाणे अन्य कोणाचा जीव जाणार नाही अशी मागणी पीडित मुलाच्या पालकांनी सरकारकडे केली आहे.