Pune Accident Nana Patole Shocking revelations : पुण्यातील कार अपघात प्रकरणात रोज धक्कादायक (Pune Accident) खुलासे होत आहेत. त्यात आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी देखील धक्कादायक खुलासे ( Shocking revelations) केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, अल्पवयीन दोघांना चिरडले त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता. तसेच अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ज्या ड़ॉक्टर तावरेंनी बदलले ते या प्रकरणात आणखी लोकांचे नावं घेत आहेत त्यामुळे त्यांच्या देखील जीवाला धोका आहे. असे धक्कादायक खुलासे पटोले यांनी केले ते मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
2014 मध्ये 41, यंदा फक्त 6 ‘भिडू’ देताहेत PM मोदींना टक्कर; उमेदवारांची प्रोफाइलही खास..
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणी जी चौकशी समिती सरकारकडून नेमण्यात आली आहे त्यातील सापळे यांच्यावरच भ्रष्टाचार आरोप आहेत. मात्र सरकारने ससून रुग्णालय पोलीस तसेच राजकीय नेते या सर्वांना वाचण्यासाठी ही समिती नेमली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी. अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली.
भाजप नेते बृजभूषण यांचा मुलगा करण सिंहच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
तसेच या प्रकरणांमध्ये दोघांना चिडणाऱ्या अल्पवयीन मुलासोबत आमदाराचा मुलगा देखील होता. असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. तसेच या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले ससूनचे डॉक्टर तावरे हे कोणत्या नेत्यांच्या दबावाखाली आपण अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले? हे जाहीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. ते या घटनेचे साक्षीदार आहेत. असंही पटोले म्हणाले.
तसेच सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देत पटोले म्हणाले की, ज्या प्रमाणे या घटनेत पुरावे नाहीसे केले जात होते. त्यावरून ही घटना हाय प्रोफाईल आहे. त्यामुळे या घटनेमध्ये मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. असं म्हणाले पटोले.