Rahul Gandhi On Pune Accident : ट्रकचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलायं. दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणीला कारने चिरडल्याची (Pune Accident) घटना घडली. या घटनेप्रकरणी न्यायालयाने अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा दिलीयं. त्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चांगलच धारेवर धरलंय. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केलायं.
नरेंद्र मोदी दो हिंदुस्तान बना रहे हैं – जहां न्याय भी दौलत का मोहताज है। pic.twitter.com/uuJHvDdeRD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2024
राहुल गांधी म्हणाले, देशातील ट्रकचालक, बसचालक, ओला, उबर, रिक्षाचालकांनी कोणाला ठार मारलं तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत घरातल्या अल्पवयीन मुलगा दारु पिऊन गाडी चालवत असेल आणि दोन जणांचा जीव घेत असेल तर त्याला निबंध लिहिण्यास सांगत आहेत. तर मग ट्रकचालक, रिक्षाचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी केलायं.
त्यांना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास माझ्या चेहऱ्यावर शेण पडेल; प्रशांत किशोरांचा दावा कुणाबद्दल?
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलं, दोन हिंदुस्तान बनले आहेत, एक करोडपतींचा आणि एक गरीबांचा , त्यावर ते म्हणतात म्हणतात मी सर्वांनाच गरीब बनवू का? पण हा प्रश्न न्यायाचा आहे. गरीब आणि श्रीमंत दोघांनाही न्याय मिळाला हवा, न्याय हा सर्वांसाठी एकसारखाच असला पाहिजे, त्यासाठीच आम्ही अन्यायाविरोधात लढत असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.
Mirzapur 3 OTT: ‘मिर्झापूर 3’ ची प्रतीक्षा लवकरच संपणार? ‘त्या’ पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळतात त्यांनी वेदात अग्रवाल ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. त्यावेळी वेदांत याचे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, घडलेली घटना दुर्दैवी असली तरी कलमात जामीन मिळण्याची तरतूद आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाने काही प्रमुख अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, आरोपीला येरवड्याच्या वाहतूक पोलिसात १५ दिवस काम करावे लागणार आहे. तसेच आरोपीने अपघातावर निबंध लिहावा, आरोपीने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी कोर्टाने घातल्या. व त्याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं.
नेमकं काय घडलं होतं?
प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.