सावरकरांच्या चांगल्या कामांवर पाच ओळी बोलून दाखवा; मोदींचं राहुल गांधींना खुलं चॅलेंज

सावरकरांच्या चांगल्या कामांवर पाच ओळी बोलून दाखवा; मोदींचं राहुल गांधींना खुलं चॅलेंज

Pm Narendra Modi : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या चांगल्या कामाबद्दल पाच ओळी बोलून दाखवाव्यात, असं खुलं चॅलेंजच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी दिलंय. कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.

सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यास सुरूवात, 14 जणांना मिळालं नागरिकत्व; गृहमंत्रायलाची माहिती

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसचे शहजादे कायम सावरकरांच्या विरोधात बोलातात. परंतु जेव्हापासून निवडणुका लागल्यात तेव्हापासून त्यांनी सावरकरांबद्दल शब्दही काढला नाही असंही मोदी म्हणाले आहेत. तसंच, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वीर सावरकरांच्या चांगल्या कामावर पाच ओळी बोलावीत असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधींच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तस सांगितल्यामुळे ते सावरकरांवर बोलत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

काही भोंग्यांकडून दररोज सकाळी जनतेची दिशाभूल; दादा भुसेंची राऊतांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या लोकसभा उमेदवार भारती पवार याच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली. यावेळी जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर ‘नकली सेना’ म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला. नकली शिवसेना आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचंही भाकीत मोदींनी यावेळी केलंय.

नाशिकच्या जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदींची कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडली. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. दरम्यान, मुंबईत पाय ठेवताच नरेंद्र मोदी यांचा ठाकरेंवर टीका करण्याचा स्वर काही प्रमाणात नरमल्याचं दिसलं. महाराष्ट्रातील अगोदरच्या सभांमध्ये मोदींनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केले आहेत. मात्र, मुंबईकडं येताच त्यांचा ठाकरेंऐवजी काँग्रेसवर जारदार टीका केली.

काँग्रेसकडून तृष्टीकरणाचा खेळ :
आजही काँग्रेस आणि इंडिया आघाडी तृष्टीकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचं लक्ष एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणावर आहे. त्यांनी प्रयोग सुरु केला आहे. कर्नाटकात त्यांनी त्याची लॅबोरेटरी बनवली आहे. कर्नाटकात जितके मुसलमान होते, त्यांनी रातोरात हुकूम काढला की, सर्व मुसलमान ओबीसी आहेत. ओबीसींच्या कोट्यातील खूप मोठी लूट केली. आरक्षणाची हीच लूट काँग्रेस संपूर्ण देशात करु इच्छित असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज