4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र

4 जूनला इंडियाचं सरकार बनतंय; मोदींच्या हातातून निवडणूक निसटली…; राहुल गांधींचे टीकास्त्र

Rahul Gandhi on PM Modi : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress) मोठा आरोप केला. कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप त्यांनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदींवर घणाघाती टीका केली.

दहा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकरांना न्याय मिळणार! उद्या निकाल लागण्याची शक्यता 

मोदींच्या हातातून निवडणूक निसटून चालली आहे, त्यामुळं ते तुम्हाला भटकाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ते म्हणाले, देशातील युवा ही देशाची शक्ती आहे. नरेंद्र मोदींच्या हातून निवडणूक निसटत चालली आहे. ते पुन्हा भारताचे पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळं मोदींनी ठरवले आहे आणि काही ना काही करून तुमचं ध्यान भटकवायचं. ते काहीतरी नाटक करून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे. ते खोटे बोलत आहेत. मोदींनी दोन करोड तरुणांना रोजगार देण्याचं खोटं आश्वासन दिलं होतं. नोटबंदी केली. जीएसटी लागू केलं. त्यांनी जे काही केलं ते अदानी अंबानींसाठी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी सातत्याने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींना खोचक टोला लगावत देशातील तरुणाईला मोठं आश्वासन दिलं. 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनत आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही देशातील 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरती प्रक्रिया सुरू करू, ही आमची गॅरंटी आहे. ‘भरती भरोसा स्कीमच्या माध्यमातून तरुणांना काम मिळणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज