त्यांना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास माझ्या चेहऱ्यावर शेण पडेल; प्रशांत किशोरांचा दावा कुणाबद्दल?

त्यांना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास माझ्या चेहऱ्यावर शेण पडेल; प्रशांत किशोरांचा दावा कुणाबद्दल?

Political strategist Prashant Kishor Claim about Jagan mohan Reddy : देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची ( Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. 7 टप्प्यामध्ये मतदान पार पडल्यानंतर 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. मात्र या दरम्यान राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर ( Prashant Kishor) यांनी एक मोठा दावा केला आहे. हा दावा आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी ( Jagan mohan Reddy ) यांच्या पक्षाबाबत आहे.

Pushpa 2 OTT : रिलीज आधीच ‘पुष्पा 2’ने कमावले 1200 कोटी? ओटीटीसाठीची डील पक्की!

नुकतीच प्रशांत किशोर यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी देशभरात सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत भाकीत केलं आहे. त्यात त्यांनी भाजपला किती जागा मिळतील? याचा दावा केला तसेच त्यांनी आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाबाबत एक मोठा दावा केला.

हे यश तुमचंच, 4 जूनला जल्लोष करू; बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांना पत्र

ते म्हणाले की, 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निकालामध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला 151 नक्कीच कमी जागा मिळतील. मात्र त्यांना 151 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास माझ्या चेहऱ्यावर शेण पडेल. तसेच माझा अंदाज खरा निघाल्यास रेड्डी यांच्या तोंडावर शेण पडो. असा दावा किशोर यांनी केला आहे.

त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये इतर अनेक प्रश्नांना उत्तर देताना किशोर यांनी सांगितलं की, या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. मात्र त्यांनी पहिलं शतक कोणत्याही दबावाविना बिनधास्त केलं. तर दुसरं शतक सहा झेल सुटल्यानंतर केलं आहे. तर काँग्रेसबाबत बोलताना किशोर म्हणाले, अमेठीची जागा प्रियंका गांधी यांना द्यायला हवी होती. कारण ज्याच्यावर विश्वास आहे तो उमेदवार देणे गैर नाही. असेही किशोर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube