Pune-Ahmednagar high way will clean : पुणे शहरानंतर आता पुणे जिल्ह्यात देखील शाहराच्याच धर्तीवर स्वच्छ जिल्हा, सुंदर जिल्हा ही संकल्पना राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निश्चय केला आहे. या अंतर्गत महामार्गांवरूल गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकाल्पांची उभारमी करण्यात येणार आहे.
सोहम ग्रुपचे पुण्यानंतर मुंबईतही रिवोल्टचे शोरुम
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुणे- अहमदनगर या महामार्गावरील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे- अहमदनगर महामार्गावर चकाचक होणार आहे. तर महामार्गालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला आळा बसून महामार्ग स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. या गावामध्ये केसनंद, लोणीकंद, बकोरी, पेरणे आणि कोरेगाव भीमा या पाच गावांचा सामावेश आहे.
UPSC Result : वडील चहाच्या टपरीवर अन् आई बिडी वळायची; अहमदनगरच्या मंगेशचे डोळे दिपवणारे यश
हा प्रकल्प राबवण्यासाठी स्थानिक प्रशासन, जिल्हा परिषद आणि कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून निधीची उभारणी केली जाणार आहे. या पाच गावांमध्ये या प्रकल्पांची सुरूवात झाल्यानंतर हळुहळु पूर्ण जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या संबंधित गावांच्या सरपंचांशी बैठक घेतली.
काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण
प्रकल्पांचे संभाव्य फायदे : महामार्ग कचरामुक्त होण्यास मदत, रस्त्याच्या कडेवरील कचऱ्यामुळे सुटणारी दुर्गंधी कमी होणार, गावे कचरामुक्त होणार, कचऱ्याच्या माध्यमातून सेंद्रिय खताची निर्मिती करता येणार, इंधन आणि खतांच्या विक्रीतून ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न मिळणार, गाव आणि महामार्गावर शाश्वत स्वच्छता राहणार, पर्यावरण रक्षणासाठी मदत होणार, प्रवाशांसाठी आरोग्यदायी वातावरणनिर्मिती होणार, गावासाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा, ‘नियमितपणे कचरा संकलन होणार, कचरा वाहून नेण्यासाठी वाहन व्यवस्था होणार, कचऱ्यावर प्रक्रिया करता येणार, कचरा व्यवस्थापन प्रकल्पातून सेंद्रिय खताची निर्मिती होणार, इंधननिर्मिती होणार.