ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात पडला पार
“डिझाईन थिंकिंग, उद्योजकता आणि इकोसिस्टिम्सद्वारे औद्योगिक नवकल्पनांना चालना” या विषयावर आधारित ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन
Online Faculty Development Program : “डिझाईन थिंकिंग, उद्योजकता आणि इकोसिस्टिम्सद्वारे औद्योगिक नवकल्पनांना चालना” या विषयावर आधारित AICET–अटल प्रायोजित सहा दिवसीय ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन साईबालाजी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस पुणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन 24 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि साईबालाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनीष आर. मुंदडा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांगीण राष्ट्रनिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपक्रमांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित केले. विविध क्षेत्रातील प्राध्यापकांच्या अद्ययावत ज्ञानवृद्धीसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, AICET च्या देशभरातील कौशल्यविकास उपक्रमांचे कौतुक करताना अटल उपक्रमांतर्गत आयोजित हजारो एफडीपींच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल त्यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची प्रशंसा केली.
यावेळी साईबालाजी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव प्रा. निरुपमा मुंदडा यांचा कार्यक्रमात आभासी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात डॉ. अनामिका सिंग, संचालक,एसबीआयआयएमएस यांनी सर्व मान्यवर, तज्ज्ञ व सहभागींचे मनःपूर्वक स्वागत केले. या एफडीपीच्या संकल्पनेपासून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीपर्यंत सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रा. मनीष मुंदडा यांचे विशेष आभार मानले. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साईबालाजी एज्युकेशन सोसायटी सातत्याने उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यानंतर मान्यवर पाहुणे डॉ. देविदास गोल्हार, संचालक, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन लिंककेजेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील नवकल्पनांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचारसरणी विकसित करण्यासाठी प्राध्यापकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. ऋषिकेश काकांडीकर यांनी या एफडीपीसाठी देशातील 20 राज्यांमधून विविध क्षेत्रांतील 400 पेक्षा अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती दिली.
