Download App

Pune Bazaar Samiti Election : २४ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी ‘इतके’ उमेदवार… २१ एप्रिलला कळणार चित्र!

Pune Bazaar Samiti Election : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. एकूण ५४२ अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी चार गटांत मिळून हे अर्ज दाखल झाले आहेत. ५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवाराला अर्ज माघारी घेता येणार आहेत. २१ एप्रिल रोजी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. तब्बल २४ वर्षांनी पुणे बाजार समितीची निवडणूक होत असून उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

२८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण १८ जागांसाठी १७ हजार ७४६ जण मतदान करणार आहेत. व्यापारी आडते मतदार संघात सर्वाधिक १३ हजार ९७४ मतदार आहेत. ते दोन प्रतिनिधी निवडणूक देणार आहेत. यासाठी ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तांविरोधात ठाकरे, आव्हाड, राऊत, विचारे उतरणार रस्त्यावर… – Letsupp

सेवा सहकारी संस्था मतदार संघातून सर्वाधिक ११ उमेदवार निवडणूक येणार आहेत. यासाठी हवेली तालुक्‍यातील विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे १ हजार ८५२ जण मतदान करणार आहेत. यासाठी १६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघातून चौघे विजयी होणार आहेत. यासाठी हवेली तालुक्‍यातील ७१३ ग्रामपंचायत सदस्य मतदान करणार आहेत. ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हमाल मापाडी गटातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. त्यासाठी २ हजार ७ मतदार आहेत. यासाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

(13) Neelam Gorhe | निर्जन भागातीत गस्त यंत्रणा कशी असावी? गोऱ्हेंनी सांगितलं | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us