Pune : ऐतिहासिक मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळणार आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यामुळे आता अनेक वर्षे दुर्मिळ भीमथडी अश्वांचा (Bhimathdi horse)प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे संस्थापक रणजीत पवार(Ranjit Pawar) आणि बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या (National Research Center of Equines, Bikaner)प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉ. शरद मेहता (Sharad Mehta)यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…
यावेळी रणजीत पवार म्हणाले की, भीमथडी अश्वांच्या प्रजातीचा उगम महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला. हे अश्व दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळतात. ऐतिहासिकदृष्ट्या भीमथडी अश्वांनी मराठा साम्राज्याचे घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
…म्हणून पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…
असे असले तरीही दुर्दैवाने भारतातील 6 मान्यताप्राप्त अश्व प्रजातीमध्ये आजवर भीमथडी अश्वांना मान्यता मिळाली नाही. हेच लक्षात घेत आम्ही अश्वप्रेमी आणि महाराष्ट्रातील काही अश्व प्रजातींचे संवर्धन करणाऱ्यांनी या प्रजातीची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आम्हाला अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी), बारामती आणि इतर सहकारी यांचीही मोलाची मदत झाली.
याअंतर्गत राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राच्या सहकाऱ्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली. याद्वारे वैज्ञानिक आणि प्रशासकीय आवश्यकतांची पूर्तता करण्यात आली. त्याशिवाय डॉ. मेहता यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने बारामतीला भेट दिली. महाराष्ट्रात आम्ही स्वतः देखील विविध स्थळांना भेटी देऊन स्थानिक शेतकरी आणि अश्व पालकांना भेटी देऊन भीमथडी अश्वांची खरी उपयुक्तता आणि क्षमता त्यांना दाखवून दिली. आता आमच्या या तीन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून भीमथडी अश्वांना अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा मिळणार असल्याचेही यावेळी पवार यांनी सांगितले.
डॉ. मेहता यांनी सांगितले की, भीमथडी अश्व प्रजातीला अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी 1000 हून अधिक घोड्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करुन ते नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्स (एनआरसीई)कडे पाठवले. त्यातील 500 हून अधिक नमुन्यांची डीएनए चाचणी केली. ही खरोखरच एक स्वतंत्र प्रजाती आहे. भारतातील कोणत्याही प्रस्थापित प्रजातीसोबत तिचा डीएनए जुळत नाही याची खात्री करुन घेण्यात आली.