Download App

Pune BJP: अखेर धीरज घाटेंचा वनवास संपला; प्रस्थापितांना डावलत मिळाली नवी जबाबदारी

Pune BJP President :   भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

सध्या ते पुणे शहर प्रभारी व प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते. या निवडीनंतर घाटे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. राज्यात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीचे असलेले मजबूत सरकार तसेच केंद्रात हिंदुस्थानचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना ही जबाबदारी मिळालेली आहे.

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

पुणे शहरात भारतीय जनता पार्टी येत्या सर्व निवडणुका अत्यंत जोमाने जिंकून आणून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे. या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

धीरज घाटे हे भाजपचे निष्ठावान नेते म्हणून ओळखळे जातात. ते लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी गेल्यावेळेस देखील चर्चेत होते. पण तेव्हा जगदीश मुळीक यांना ती जबाबदारी देण्यात आली. तसचे कसबा पोटनिवडणुकीच्या वेळेसही धीरज घाटेंचे नाव आघाडीवर होते. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील दत्तवाडी, जनता वसाहत या भागात धीरज घाटे यांचा मोठा प्रभाव आहे. पण तेव्हा देखील धीरज घाटेंच्याऐवजी हेमंत रासनेंना उमेदवारी मिळाली. त्यामुळे अखेर त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असल्याने त्यांचा वनवास संपल्याचे बोलले जात आहे.

BJP News : जिल्हाध्यक्षांच्या नव्या टीमची घोषणा; पिंपरीची धुरा दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बंधूंवर

दरम्यान, सध्या भाजपचे शहराध्यक्ष म्हणून माजी आमदार जगदीश मुळीक हे काम पाहत होते. काही महिन्यांपूर्वी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर जगदीश मुळीक यांची या पदावरुन उचलबांगडी होणार असे बोलले जात होते. पण आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांची निवड जारी केली आहे.

Tags

follow us