Download App

पुण्यातील तीन राजकीय नेत्यांना धमकी देणारा एकच… पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Pune Breaking : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना खंडणी आणि धमक्याचे सत्र सुरु आहे. यामध्ये भाजपचे भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. विशेष बाब म्हणजे वरील तीनही राजकीय पुढाऱ्यांना धमक्या देणारा आरोपी हा एकच आहे.

एकतर्फी प्रेमातून मुलीला धडा शिकवण्यासाठी तिच्या नावाने इम्रान शेख हा तरुण या राजकीय पुढाऱ्यांकडे खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत होता. सातत्याने राजकीय पुढाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेशन विभागाकडे देण्यात आली होती.

चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने खळबळ ! म्हणाले, अमोल कोल्हे भाजपात येणार असतील तर.. – Letsupp

विशेष बाब म्हणजे इम्रान शेख या तरुणाला यापूर्वीच मनसे नेते वसंत मोरे यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्याची काही दिवसांपूर्वी जामीनावर सुटका करण्यात आली होती. परंतु, जेलमधून बाहेर आल्यावर त्याचे हे प्रताप सुरुच होते.

भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सुरु केलेल्या परिवर्तन हेल्पलाईनवर मागील आठवड्यात इम्रान शेख याने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनंतर त्याने काँग्रसेचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना फोन करुन खंडणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Tags

follow us