मोठी बातमी ! सात पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; पुणे अन् चंद्रपूरसाठी ‘वेट अँड वॉच’

Pune byelection : देशात सात ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूरची पोटनिडणूक जाहीर करण्यात आली नाही. गिरीष बापट आणि सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर सध्या तरी निवडणूक होणार नाही. देशात सात ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पण पुणे आणि चंद्रपूरला का वगळण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला […]

Pune Byelection

Pune Byelection

Pune byelection : देशात सात ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुणे आणि चंद्रपूरची पोटनिडणूक जाहीर करण्यात आली नाही. गिरीष बापट आणि सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर सध्या तरी निवडणूक होणार नाही. देशात सात ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पण पुणे आणि चंद्रपूरला का वगळण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशातील झारखंड, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यातील सात जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या विधानसभेच्या जागा आहेत आणि या जागांचा कार्यकाळ बराच शिल्लक आहे. महाराष्ट्रात ज्या जागा शिल्लक आहेत त्यामध्ये दोन्ही जागा लोकसभेच्या आहेत. त्यामुळे या जागांबाबत अजून कोणातही निर्णय झालेला नाही.

पेशवे, औरंगजेब वक्तव्य प्रकरण; भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक जाहीर केली जाते. पुण्याचे खासदार गिरीष बापट यांचे 29 मार्चला निधन झाले होते. आता केरळ मध्ये जी पोटनिडणूक जाहीर झाली आहे, त्यामध्ये ओमन चंडी यांचे निधन जुलै महिन्यात झाले होते. पुण्यानंतर ज्या ठिकाणी जागा रिक्त झाल्या आहेत त्यांच्यादेखील निवडणुका जाहीर होत आहेत. मात्र पुणे आणि चंद्रपूरच्या पोटनिवडणूका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत.

चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना परवानगी, राज्य सरकारने आखले नवीन धोरण

पुण्याच्या रिक्त झालेल्या जागेवर अनेक इच्छूकांनी तयारी सुरु केली होती. काहीचे भावी खासदार म्हणून देखील बॅनर लागले होते. तर उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातील नेत्यांकडे लॉबिंग देखील केले जात होते. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि मनसे या चारही पक्षांतील इच्छूकांकडू दावे प्रतिदावे सुरु होते. पण पुढील काळात पोटनिवडणूका जाहीर होतील की नाही याबद्दल देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Exit mobile version