पेशवे, औरंगजेब वक्तव्य प्रकरण; भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

पेशवे, औरंगजेब वक्तव्य प्रकरण; भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

Bhalchandra Nemade : औरंगजेब आणि नानासाहेब पेशवे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपाच्या कायदेशीर सल्लागार विभागाने नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात नेमाडे यांनी नानासाहेब पेशव्यांना 8 ते 10 वर्षाच्या कोवळ्या मुली लागायच्या. तसेच दुसऱ्या बाजीरावाने पेशव्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचवला आणि इंग्रजांकडे सोपवला, असे म्हटले होते.

औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नव्हता. औरंगजेबच्या दोन हिंतू राणींना काशी-विश्वेश्वर मंदिरातील पंडे यांनी मंदिराजवळील भुयारात नेऊन भष्ट केलं होतं औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं, असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला होता.

GST पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल; उत्तर प्रदेश, गुजरात आसपासही नाहीत!

महाराष्ट्र भाजपाने सोशल मीडिया कायदेशीर सल्लागार विभागाचे प्रमुख अॅड. अशुतोष दुबे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दुबे यांनी ट्विटमध्ये म्हटले की ”भालचंद्र नेमाडे या लेखकाविरोधात मी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नेमाडे यांनी हिंदू ब्राम्हणांना भडकवणारं, ज्ञानवापी प्रकरणी हस्तक्षेप करणारं आणि जनतेला चिथावणी देणारं भाषण केलं आहे. या विधानातून त्यांनी सार्वजनिक सलोखा बिघडवला आहे. त्यामुले मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधि कलमांतर्गत योग्य ती कारवाी करावी.”

चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना परवानगी, राज्य सरकारने आखले नवीन धोरण

नेमाडेंनी काय म्हटले होते?
औरंगजेबाच्या दोन राण्या हिंदू होत्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नसायचा. तुम्हाला माहीत आहे की शाहजानची आईही हिंदू होती. अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या काशी-विश्वेश्वराला गेल्या होत्या. त्या परत आल्याच नाहीत. छावणीतले लोकही म्हणाले, दोन्ही राण्या कुठे गेल्या. ते आम्हाला माहीत नाही. तेव्हा औरंगजेबाला समजलं की काशी विश्वेश्वर मंदिरातील जे पंडे होते. ते तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. असे पंडे असतील तर त्यांना मारलंच पाहिजे. इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की औरंगजेब हिंदू द्वेष्टा होता. पंडे हे काही हिंदू होते का? बायकांना भ्रष्ट करणारे? औरंगजेबाच्या दोन्ही बायकांना भ्रष्ट करण्यात आलं म्हणून त्याने मंदिर फोडलं. पुस्तकं वाचूनच हे कळतं, असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube