CM Eknath Shinde In Jejuri : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.(Pune Chief Minister Eknath Shinde in Jejuri on 7th August Major changes in transportation shasan aplya dari)
त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 7 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री. 9 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मुंबईमधील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं यजमानपद कोणाकडं? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीमधील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्यासाठी जेजुरी, सासवडकडे येणारी जड अवजड व इतर-वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण-सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीमधील वाहतूक : बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुण्याकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीमधील वाहतूक: पुण्याकडून जेजुरी मार्गे फलटण-साताऱ्याकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती सासवड-नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर-वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
वाहतुकीला लावलेले निर्बंध 7 ऑगस्ट रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.