उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा पुणे जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम जेजुरीत… शिवतारेंविषयी काय बोलणार?

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा पुणे जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम जेजुरीत… शिवतारेंविषयी काय बोलणार?

Ajit Pawar vs Vijay Shivatare:‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे नेते, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे एका मंचावर येण्याची शक्यता आहे. 7 ऑगस्टला पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. विजय शिवतारे हे सातत्याने पवार कुटूंबावर टीका करत आले आहेत पण गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आता राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. युतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विजय शिवतारे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छाही दिल्या होत्या. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मुंबईमधील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं यजमानपद कोणाकडं? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपने 45 प्लसचे टार्गेट आहे. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक जोर बारामती मतदारसंघावर दिला आहे. त्यामुळे भाजपला विजय शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा मतदारसंघ महत्वाचा आहे. शिवतारे हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे समजले जातात. 2019 ला काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा पराभव केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी शिवतारेंना उघडपणे निवडून कसा येतो, अशी धमकीच दिली होती.

‘भाजपमध्ये येण्यासाठी रांग पण, फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबलचा बोर्ड लावलाय ‘

त्यानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. त्यावेळी अजित पवार यांचा शिवतारेंच्या मतदारसंघावर डोळा होता. पण आता बदलेल्या समीकरणाने खरंच अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वाद मिटला आहे का? जेजुरीच्या कार्यक्रमातून अजित पवार शिवतारेंविषयी काय बोलणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube