Pune : पुण्यामध्ये (Pune) बाणेर या उच्च प्रतिष्ठित भागामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे (Pune Crime Branchकराडच्या युवकाकडून पिस्तूल अन् मुळशीच्या घाटात सराव… मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक) शाखेने बुधवारी रात्री मोठी कारवाई केली. यामध्ये बाणेर मधील एका बड्या हॉटेलमधून अकरा महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राजस्थानी युट्युब मॉडेल आणि दोन रशियन महिला यांच्या माहितीवरून करण्यात आली.
‘आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही पण, CM अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी’.. जरांगेंनी काय सांगतिलं ?
या राजस्थानी युट्युब मॉडेल आणि दोन रशियन महिला यांची गेल्याच आठवड्यात कोरेगाव पार्क या भागातील एका प्रतिष्ठित हॉटेलमधून पोलिसांनी सुटका केली होती. बाणेरमधील या हॉटेलमधील महिलांना देखील त्याच दलाकडून अडकवण्यात आले होते. ज्याच्याकडून राजस्थानी युट्युब मॉडेल आणि रशियन महिलांना अडकवण्यात आले होते. हा दलाल बाणेरमधील आहे.
Mrunmayi Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा साडीतील सुंदर-सोज्वळ लूक
त्यामुळे व्हाट्सअपद्वारे चालवला जाणारा या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तर या महिलांमध्ये एक नवी मुंबईची तर इतर परराज्यातील मुली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या प्रकरणी अद्याप पुढील तपास देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत पुण्यासह अनेक ठिकाणी अशा प्रकरचे प्रकरण वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे.
बेकायदेशीर विदेशी तरूणींच्या ‘अरेबियन नाईट्स’ चं आयोजन
या अगोदर गेल्या काही महिन्यांपूर्वी पुणे या शहराला (Pune News) राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र पुण्यामध्ये देखील आता डान्सबारची (Dance Bar) छमछम सुरू झाली होती. काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या नावाखाली विदेशी तरूणींच्या नृत्यांचे कार्यक्रम सुरू केले होते.
पबमध्ये नाचणाऱ्या या तरूणी पर्यटन व्हिसावर भारतात येत होत्या. त्यामुळे त्यांना व्यावसाय करण्याची परवानगी नसते. मात्र हे हॉटेल्स आणि पबवाले. बेधकपणे त्यांच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातून हायप्रोफाईल वेश्याव्यावसाय देखील फोफावत चालला असल्याचं. सामाजिक सुरक्षा विभागाच्या एका कारवाईतून समोर आले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असल्याने यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.