Pune Crime : पुण्यात एका तरुणीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा या तरुणाने ठार मारल्याची घटना नुकतीच घडली. कृष्णा कनौजा याने तरुणीवर कंपनीच्या आवारातच चाकूने वार केले. (Pune Crime ) त्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली. चौकशीमध्ये कृष्णा कनौजा काही खुलासे केले आहेत.
मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलीस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असं वाटलं नव्हतं, असं कृष्णा कनौजा याने सांगितलं. कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.
धक्कादायक! पुण्यात मित्रानेच तरूणीला संपवलं, कोयत्याने केले सपासप वार
तरुणीला आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णाने तीला तब्बल चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो तीच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होता. मात्र, ती पैसे परत देत नव्हती. त्यामुळे कृष्णा आणि तीच्यात कामाच्या ठिकाणी वादही झाला होता. तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रारही दिली होती.
पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा तीच्यावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी ती कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.