Pune Crime: ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमात चिमुरडीने सांगितले वडिलांचे प्रताप; आरोपी बापाला अटक

Pune Crime: ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमात चिमुरडीने सांगितले वडिलांचे प्रताप; आरोपी बापाला अटक

Pune Crime News: सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक (Pune Crime News) आणि बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. (Pune News) पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगीक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. (Crime News) शाळेतील ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमातून उघडकीस आला गंभीरप्रकार समोर आला असून नराधम बापाला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा मुळचा बिहारचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागच्या 1 वर्षापासुन तो मुलीला चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत तो एक वर्ष स्वतच्या मुलीवर तो लैंगीक अत्याचार करत होता आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले, असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे.

पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता त्या घटनेची पुनरावृत्ती पुणे येथे उघडकीस आली आहे. (Crime News) पुण्यात चालत्या स्कुल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे.(Pune News) या धक्कादायक घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Police) पुण्यातील वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. 45 वर्षीय व्यक्तीवर या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : पुण्यात मैत्रीला काळीमा! मित्रांकडून तरूणीचं आधी अपहरण अन् खंडणी मिळवल्यानंतर

मिळालेल्या माहितीनुसार, एका नामांकित शाळेतील चिमुरडीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी हा या शाळेतील चिमुरडींना बसमधून शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करतो. बसमध्ये दोन्ही चिमुरडी या पुढच्या सीटवर बसत असत. बस चालकाने 6 वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 4 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालत्या बसमध्ये चिमुरडींसोबत अश्लील चाळे करत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही चिमुरडीना जवळ बसून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात देखील त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. अल्पवयीन चिमुरडी घरी परतल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यानंतर मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला सगळा धक्कादायक प्रकार आईला सांगितला. चिमुकलीने या सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube