Pune News : जुलूस मिरवणुकीत दु:खद घटना; झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक, एकाचा मृत्यू

  • Written By: Published:
Pune News : जुलूस मिरवणुकीत दु:खद घटना; झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक, एकाचा मृत्यू

Two Died In Julus Procession : पुण्यात जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील (Pune) वडगाव शेरी या परिसरात आज (रविवार) ईदच्या निमित्ताने जुलूस मिरवणुकीत सुरू असताना दोन मुलांकडून हातात झेंडा फडकत असताना वरती एका विजेचे तारेला चिटकले. या दोन्ही मुलांना विजेचा जोरदार झटका बसला.

तुम्ही सुरुवात केली आम्ही शेवट करू; आमच्या तरुणांना मारहाण, जरांगे पाटलांकडून फडणवीसांवर प्रहार

या घटनेमध्ये एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीररित्या जखमी आहे. ज्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरी परिसरात ही घटना आज अर्ध्या तासापूर्वी घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर रित्या जखमी झाला आहे. जवळच्या रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या