Download App

पती नपुसंक! मुल हवं असेल तर सासऱ्यांशी संबंध ठेव, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ

पती नपुसंक असल्याने तूला मुल हवं असेल तर सासऱ्यांशी संंबंध ठेव, असा दबाव सासरच्यांकडून केला जात असल्याने पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केलीयं.

Pune News : पती नपुसंक असल्याने मुल हवं असेल तर सासऱ्याशी संबंध ठेव, असा अश्लील सल्ला सासरच्या मंडळींकडून सुनेला देण्यात आल्याचा प्रकार पुण्यात घडलायं. मागील अनेक दिवसांपासून पुणे गुन्हेगारीचं केंद्रचं बनल्याची परिस्थिती आहे. अशातच आता आणखी एका नव्या प्रकाराची भर पडलीयं.

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी…

पुण्यातील सहकारनगर भागात राहणाऱ्या पीडित सुनेला सासऱ्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी केलीयं. विशेष म्हणजे मागणी करणारा सासरा हा माजी पोलिस अधिकारी आहे. पीडित महिलेचा पती गौरव जयसिंग तांबे वय 35, सासू श्रद्धा जयसिंग तांबे 56, सासरे जयसिंग तांबे 61 यांच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

आता व्हॉट्सअपवर सरकारी सेवा अन् योजनांचं काम; लेटेस्ट व्हर्जनचं फडणवीसांकडून सूतोवाच

पाच महिन्यांपूर्वीच पीडित महिलेचा पती गौरव तांबेशी विवाह झाला. विवाहानंतर पीडिता आणि पती हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले. त्या ठिकाणी पतीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याचं पीडितेने सांगितलंय. पीडितेने म्हटलं की, तिचा पती गौरव तांबे हा नपुसंक आहे. त्यामुळे तूला मुल हवं असेल तर सासरे जयसिंग यांच्याशी संबंध ठेव असा दबाव सासरच्या मंडळींकडून करण्यात आला. सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीकडून आणि सासूनकडून वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोपही तिने केलायं.

घरात सासू आणि पतीकडून दबाव सुरु असतानाच 10 सप्टेंबरच्या रात्री सासरा जयसिंग तांबे घरी आल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्तीने संबंध ठेवण्याची मागणी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्रास सहन न झाल्याने पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केलीयं.

follow us