Moneylender Nanasaheb Gaikwad Luxurious Car Seized : वैष्णवी हगवणे प्रकरणात (Vaishnavi Hagawane) रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या देखील अडचणी (Pune Crime) वाढल्या आहेत. सुपेकरांवर खंडणीचा आरोप केला जातोय. असाच एक आरोप पुण्यातील नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) नावाच्या सावकाराने केलाय. पण आता याच सावकराची मायानगरी समोर आल्याने पोलीसच चक्रावले आहेत. पोलिसांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून रोल्स रॉयल, रेंज रोवर, पजेरो, मर्सडिज आणि इतर आलिशान चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या कोट्यवधी रूपये किमतीच्या आहेत.
दोन मकोकाचे गुन्हे
लोकांना लुबाडून त्या पैशातून गायकवाडने मोठी मायानगरी उभारली. लोकांच्या जमिनी हडप करत त्याने व्याजातून मोठी संपत्ती कमावली. नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या पिता पुत्रांवर चार वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी दोन मकोकाचे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात धाडलं होतं. हे दोघंही जवळपास दीड महिना पोलिसांना गुंगारा देत होते.
बदला घेतला! रशियाचा यूक्रेनवर मोठा हल्ला, क्षेपणास्त्रांचा पाऊस अन् ड्रोन हल्ले
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव आलं. त्यानंतर गायकवाड पिता-पुत्रांनी सुपेकरांनी कोट्यावधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला. तर गायकवाडवर सुद्धा गु्न्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्ंयांच्या अनेक आलिशान कार जप्त केल्या. या कार चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभ्या आहेत. यामध्ये मर्सिडीज, रोल्स रॉयल रेंज-रोवर, ऑडी, पजेरो, लँड क्रूझर या गाड्यांचा समावेश आहे.
गृहकर्ज, कार कर्ज स्वस्त अन् ईएमआय कमी होणार? सर्वांच्या नजरा आरबीआयवर
आलिशान कार पोलीस ठाण्याच्या आवारात
-मर्सिडीज-JH 12 F 4444
रोल्स रॉयल्स-MH 12 RF 4444
रेंज रोव्हर-J H 10 K 4444
इनडेव्हर -MH 12 TH 4444
पजेरो-MH 12 HB 4444
ऑडी-MH 14 GY 4444
हगवणे प्रकरणात आज काय होणार?
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे पोलीस या दोघांना आज दुपारी तीन वाजता खेड न्यायालयात हजर करणार आहेत. तर आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला, याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये समिती नेमण्यात आलीय. ही समिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.