आमिर खानच्या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘सितारे जमीन पर’ चं पहिलं टायटल ट्रॅक प्रदर्शित!

The first title track of Aamir Khan’s much-awaited film ‘Sitare Zameen Par’ is out :आमिर खान यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ आता प्रदर्शानाच्या उंबरठ्यावर असून, प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ या क्लासिक चित्रपटाचा एक प्रकारचा आध्यात्मिक सिक्वेल असून, पुन्हा एकदा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकण्याचे वचन देते.या चित्रपटाचा सर्वाधिक रोमांचक भाग म्हणजे आमिर खानसोबत 10 नवोदित युवा कलाकारांचा सहभाग यामध्ये आहे. ज्यामुळे चित्रपटात नवचैतन्य आणि ताजेपणा अनुभवता येतो. या उत्सुकतेला आणखी चालना देत, निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टायटल ट्रॅक प्रदर्शित केला आहे.हे गाणं एक सुंदर आणि प्रेरणादायी गीत आहे. जे चित्रपटाच्या प्रवासासाठी योग्य टोन सेट करतं आणि थेट मनाला स्पर्श करतं.
या गाण्यात आमिर खान एका बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत असून, लहान मुलांना शिस्त आणि मजेशीर पद्धतीने प्रशिक्षण देताना दिसतो. त्यांच्या आणि मुलांच्या नात्याची उत्कट झलक गाण्यात पाहायला मिळते. याशिवाय, आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्यातील भावनिक संवादांचेही सुंदर क्षण यात टिपले गेले आहेत, जे त्यांच्या भूमिकांमधील संवेदनशीलतेचा आभास देतात.आमिर खान प्रोडक्शन्स अंतर्गत निर्मित या चित्रपटात 10 नवोदित कलाकार आपली चमक दाखवणार आहेत. अरौश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहनी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.
3 मकोका अन् 13 गुन्ह्यांची नोंद; गायकवाड पिता-पुत्र आहेत तरी कोण?
चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे, जे याआधी ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या प्रबोधनपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक राहिले आहेत. आता ते आमिर खान प्रोडक्शन्ससोबत या मोठ्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा परतले आहेत.‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकांमध्ये झळकणार असून, या चित्रपटातील गीतांना अमिताभ भट्टाचार्य यांनी शब्दबद्ध केले आहे आणि संगीताची जबाबदारी शंकर-एहसान-लॉय यांच्याकडे आहे. दिव्य निधी शर्मा यांनी चित्रपटाचे पटकथा लेखन केले असून, आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट 20 जून 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.