Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि मानसिक त्रास दिला.
या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या तिघींनी केली. परंतु, संबंधित पोलिस ठाण्याने त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिला. इतकंच नव्हे तर पोलिसांनी एक लेखी उत्तर दिलं असून त्यात म्हटलं (Pune Police) आहे की, ही घटना एका खासगी ठिकाणी – म्हणजे बंद खोलीत घडल्यामुळे ती अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येत नाही. त्यामुळे त्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही.
200 कोटींचा फ्रंट-रनिंग घोटाळा! अॅक्सिस म्युच्युअल फंडचे माजी अधिकारी अटकेत, ईडीचे देशभरात छापे
अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार
या घटनेनंतर तीनही तरुणींनी रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. मध्यरात्री सुमारे दोन वाजता पोलिसांनी सात पानी उत्तर त्यांना दिलं, ज्यामध्ये स्पष्टपणे अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार नोंदवली जाऊ शकत नाही, असं नमूद होतं.
प्रकरण दडपलं जातंय?
तरुणींनी पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हटलंय की, हे संपूर्ण प्रकरण पुणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठीच दडपलं जात आहे. तसेच, त्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. पोलिसांनी ‘गुन्हा दाखल करता येणार नाही’ असं लेखी उत्तर दिल्यामुळे आता या तरुणींनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरीत प्रमोशन अन् लग्नाचे योग, ‘या’ राशींसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ठरणार खास
त्यांनी स्पष्ट केलं की, पोलिसांकडून नकारात्मक उत्तर मिळाल्यानंतरही आम्ही माघार घेणार नाही. पोलिसांनी दिलेल्या पत्राच्या आधारे आम्ही कोर्टात धसका घेणार असून, घटनास्थळी सार्वजनिक घटक नसल्याचा दावा करून पोलिसांनी केवळ आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.