Girl pieces in Kharadi river Pune : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करुन फेकले आहेत. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. (Pune Crime) खून झालेल्या या तरुणीचं वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक ! कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला; अत्याचार करून खून केल्याचा संशय
खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धाड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतकं आहे.
शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेवरून केलं बेताल वक्तव्य
अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिलं. अज्ञात व्यक्ती वरोधात त्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.